ETV Bharat / business

कोरोनाची चाचणी केवळ २०० रुपयात; सीएसआयआरचा रिलायन्सबरोबर करार

कोविड-१० आरटी लॅम्प, असे या किटचे नाव आहे. यामध्ये न्यूक्लिक अ‌ॅसिडवर आधारित नाक अथवा घशामधील स्त्रावाची चाचणी घेतली जाते. याबाबतच्या सीएसआयआरने घेतलेल्या चाचण्या यशस्वी झालेल्या आहेत.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : May 27, 2020, 9:11 PM IST

Updated : May 27, 2020, 10:19 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या चाचणीचा खर्च व त्याच्या निदानासाठी लागणारा वेळ हा गुंतागुंतीचा प्रश्न सुटणार आहे. विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदने (सीएसआयआर) रिलायन्सबरोबर कोविड-१० आरटी लॅम्प या किटच्या उत्पादनासाठी सामंजस्य करार केला आहे. यामधून केवळ २०० रुपयांत कोरोना चाचणी करता येते, तर कोरोना चाचणीचा अहवाल एका तासात मिळू शकतो.

कोविड-१० आरटी लॅम्प, असे या किटचे नाव आहे. यामध्ये न्यूक्लिक अ‌ॅसिडवर आधारित नाक अथवा घशामधील स्त्रावाची चाचणी घेतली जाते. याबाबतच्या सीएसआयआरने घेतलेल्या चाचण्या यशस्वी झालेल्या आहेत. याबाबत बोलताना सीएसआयआरचे संचालक डॉ. शेखर मांडे म्हणाले, की आरटी-लॅम्प ही चाचणी स्वस्त आहे. कारण त्यासाठी तुम्हाला साधनांची गरज नाही. ती चाचणी लवकर होते. ही चाचणी तुम्ही ग्रामीण भागातही घेवू शकणार आहे.

हेही वाचा- ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नव्हे 'जाळे'; टाळेबंदीतही ग्राहकांची होतेय फसवणूक

सीएसआयआरने जम्मूमधील इन्स्टिट्यूट ऑफ इंटरग्रेटिव्ह मेडिसिन आणि रिलायन्स इंडस्ट्रीजने आरटी-लॅम्प कीटचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी करार केल्याचे मंगळवारी सांगितले होते. या किटची किंमत १०० ते २०० रुपये असणार आहे.

हेही वाचा-कोरोनाची चाचणी होणार स्वस्त; आयसीएमआरने 'हा' घेतला निर्णय

दरम्यान, आयसीएमआरने कोरोना चाचणीच्या किंमतीची ४,५०० ही मर्यादा आज काढून टाकली आहे. देशात स्वदेशी तंत्रज्ञान विकसित झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Last Updated : May 27, 2020, 10:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.