ETV Bharat / business

क्रेडिट कार्डच्या मासिक हप्त्यांचे आजपर्यंतचे सर्वाधिक प्रमाण - एचडीएफसी - Angshuman Chatterjee on EMI shopping

एचडीएफसी बँकेचे प्रमुख (क्रेडिट कार्ड) अंशुमन चटर्जी म्हणाले, की क्रेडिट कार्डमधून खरेदीचे प्रमाण वाढले आहे. ग्राहकांना सवलतीत खरेदी करणे शक्य होण्यासाठी एचडीएफसी बँकेने विविध उत्पादकांशी करार केला आहे.

एचडीएफसी
एचडीएफसी
author img

By

Published : Sep 9, 2020, 1:25 PM IST

मुंबई - कोरोना महामारीत नोकऱ्या गमाविण्याचे वाढलेले प्रमाण आणि वेतन कपातीचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी मासिक हप्त्यात वस्तू खरेदी करण्याचे प्रमाण हे कोरोना महामारीत वाढले आहे. क्रेडिट कार्डवर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या एकूण मासिक हप्त्याचे आजपर्यंतचे सर्वाधिक प्रमाण असल्याचे एचडीएफसी बँकेने म्हटले आहे.

एचडीएफसी बँकेचे प्रमुख (क्रेडिट कार्ड) अंशुमन चटर्जी म्हणाले, की क्रेडिट कार्डमधून खरेदीचे प्रमाण वाढले आहे. ग्राहकांना सवलतीत खरेदी करणे शक्य होण्यासाठी एचडीएफसी बँकेने विविध उत्पादकांशी करार केला आहे. त्यामुळे ग्राहकांना वेळेत पैसे भरणे शक्य होते. ग्राहक मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करत आहेत. त्यामुळे मागणी वाढण्यासाठी मदत होत असल्याचे चटर्जी यांनी बँक कर्मचाऱ्यांना दिलेल्या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.

हेही वाचा-सिल्व्हर लेक जिओपाठोपाठ 'रिलायन्स रिटेल'मध्ये करणार ७,५०० कोटींची गुंतवणूक

एचडीएफसीने मिलिनिया क्रेडिट कार्ड ऑगस्ट २०१९मध्ये लाँच केले होते. या कार्डचे दोन वर्षांत २० लाख ग्राहक झाले आहेत. एकूण क्रेडिट कार्डधारकांपैकी ७० टक्के जण ई-कॉमर्समधून खरेदी करत आहेत. कोरोनापूर्वी हे प्रमाण ४७ टक्के होते. लसीकरण सुरू झाल्यानंतर मागणीत मोठी वाढ होईल, असेही चॅटर्जी यांनी सांगितले.

हेही वाचा-ईपीएफओकडून एप्रिल ते ऑगस्टमध्ये ९४.४१ लाखांचे दावे निकाली; ३५ हजार ४४५ कोटी वितरीत

गेल्या काही वर्षांत मागणी कमी झाल्याने अर्थव्यवस्था मंदावल्याचे विविध अहवालांमधून समोर आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.