ETV Bharat / business

कोरोनाची लस देशात 15 ऑगस्टपर्यंत उपलब्ध; 'अशी' होणार चाचण्यांची प्रक्रिया - Bharat Biotech COVAXIN

कोरोनाच्या लसीसाठी सर्व वैद्यकीय चाचण्यांची पूर्तता करण्यासाठी बीबीआयएल वेगाने काम करत आहे. मात्र, अंतिम परिणाम हा सर्व वैद्यकीय चाचण्यांवर अवलंबून असणार आहे.

कोव्हॅक्सिन
कोव्हॅक्सिन
author img

By

Published : Jul 3, 2020, 3:41 PM IST

हैदराबाद – कोरोना महामारीवर लस उपलब्ध होण्याची संपूर्ण जगाला प्रतिक्षा आहे. अशा स्थितीत भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) कोरोनाची लस ही 15 ऑगस्टला लोकांसाठी उपलब्ध होणार असल्याचे जाहीर केले आहे. लसीचे संशोधन, चाचण्या व त्यासाठी सरकारकडून परवानगी मिळण्याची प्रक्रिया किचकट आहे. असे असतानाही देशात वेगाने लस विकसित होत आहे.

आयसीएमआरने हैदराबादमधील भारत बायोटेक इंटरनॅशनच्या (बीबीआयएल) भागीदारीबरोबर लस विकसित करत असल्याचे गुरुवारी म्हटले आहे. आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव म्हणाले, की कोरोनाची लस 15 ऑगस्ट 2020 पर्यंत सार्वजनिक आरोग्यासाठी उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. सर्व वैद्यकीय चाचण्यांची पूर्तता करण्यासाठी बीबीआयएल वेगाने काम करत आहे. मात्र, अंतिम परिणाम हा सर्व वैद्यकीय चाचण्यांवर अवलंबून असणार आहे.

देशातील पहिल्या कोरोना लसीची (कोवॅक्सिन) मानवी चाचणी घेण्याची परवानगी भारतीय औषधी महानियंत्रकांनी दिल्याचे भारत बायोटेकने सोमवारी सांगितले. विशेष म्हणजे 52 दिवसांपूर्वीच भारत बायोटेकने आयसीएमआर आणि पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेबरोबर भागीदारीचा करार केला आहे. या 52 दिवसांमध्ये कंपनीने चाचणीपूर्वीचा सर्व अभ्यास आणि प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.

भारत बायोटेकचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा इल्ला ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, की लस विकसित होण्यासाठी साधारणत: 14 ते 15 वर्षे लागतात. यावरून कोरोनाच्या लसीच्या चाचणीसाठी नियमन आणि चाचणी प्रक्रिया किती वेगवान झाली असेल, याचा अंदाज येवू शकतो.

कोरोनाच्या लसीबाबत माहिती देताना इल्ला म्हणाले, की पहिल्या टप्प्यात 28 दिवस लसीची चाचणी असते. सिरॉलॉजीचे परीक्षण केले जाते. कोरोनाच्या लसीकरता स्वयंसेवकांना आरटी पीसीआर चाचणी करून प्रक्रियेत घेतले जाते. त्यांना 28 दिवस लसीचे डोस दिले जातात. त्यांचे 28 व्या दिवशी नमुने घेतले जातात. त्यानंतर पुन्हा सिरॉलॉजीचे परीक्षण केले जाते. लसीमुळे शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीने विषाणुचे विभाजन होत नाही. याला न्यूट्रालयझेशन म्हटले जाते. आम्ही रक्ताचे नमुने आणि विषाणू बीएसएल 3 प्रयोगशाळेत घेणार आहोत. त्यानंतर लशीची प्रक्रिया दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरात 140 कोरोनाच्या लसी या चाचणीच्या विविध टप्प्यात आहेत. त्यामधील 10 कोरोना लसींची मानवावर चाचणी करण्यात येत आहे. यामधील सर्वात लवकर लस ही बाजारात 2021 च्या सुरुवातीला उपलब्ध होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.