नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात कर परतावा देण्याची प्रक्रिया महसूल विभागाने वेगाने सुरू केली आहे. केंद्रीय महसूल विभागाने मार्च ३० पासून एसएमई क्षेत्रासह इतर लहान व्यवसायिकांना सुमारे १० हजार ७७९ कोटींचा कर परतावा दिला आहे.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि उत्पादन शुल्क विभागाने (सीबीआयसी) ५ हजार ५७५ कोटी रुपयांचे १२ हजार ९३३ दावे पूर्ण केले आहेत. कोरोनाच्या संकटात जीएसटी करदात्यांना मदत करण्यासाठी पूर्णपणे बांधील असल्याचे सीबीआयसीने म्हटले आहे. गेल्या आठवड्यात सुमारे ३ हजार ८५४ कोटींचे ७ हजार ७८३ दावे सीबीआयसीने पूर्ण केले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ८ एप्रिलपासून ५ हजार २०४ कोटींचा परतावा करदात्यांना दिला आहे.
हेही वाचा-फ्लिपकार्टसह वॉलमार्ट कोरोनाच्या लढ्याकरता करणार ४६ कोटींची मदत
एमएसएमईला कर परतावा दिल्याने त्यांना वेतनकपातीशिवाय चलनवलन (बिझनेस अॅक्टिव्हिटीज) सुरू ठेवता येणार असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे. करदात्यांना ८ एप्रिलपासून ५ लाखांपर्यतच्या रकमेचे १४ कर परतावे देण्यात आले आहेत. लघू उद्योगांना लवकरत ७ हजार ७६० कोटी रुपयांचे कर परतावे देणार असल्याची सीबीडीटीने माहिती दिली.
हेही वाचा-'कामगारांचे प्रश्न सोडविण्याकरता नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करा'