ETV Bharat / business

कोरोनील महागात! बाबा रामदेव यांच्यासह चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा - balkrishna

पतंजली आयुर्वेद कंपनीचे कोरोनील हे कोरोनाच्या संसर्गापासून वाचविणाचा केला. यामधून आरोपींनी लोकांची दिशाभूल केल्याचे प्राथमिक आरोपपत्रात म्हटले आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 27, 2020, 4:38 PM IST

जयपूर – कोरोनावर बाजारात औषध आणण्याचा दावा करण योगगुरू रामदेव बाबा यांना महागात पडत असल्याचे चित्र आहे. त्यांच्यासह पतंजलीचे सीईओ आचार्य बाळकृष्ण आणि इतर तीन जणांवर जयपूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पतंजली आयुर्वेद कंपनीचे कोरोनील हे कोरोनाच्या संसर्गापासून वाचविणाचा केला. यामधून आरोपींनी लोकांची दिशाभूल केल्याचे प्राथमिक आरोपपत्रात म्हटले आहे.

फसवणुकीच्या कलमाखाली जयपूरच्या ज्योतीनगर पोलीस स्टेशनमध्ये रामदेव, बाळकृष्ण, वैज्ञानिक अनुराग वार्षणेय, राष्ट्रीय वैद्यकीय संस्थेचे चेअरमन बलबीर सिंह तोम आणि संचालक अनुराग तोमर यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

राजस्थानच्या आरोग्य विभागाने जयपूरमधील एनआयएस रुग्णालयालाही नोटीस पाठविली आहे. आरोग्य विभागाने कोरोनाबाधित रुग्णांवर करण्यात आलेल्या चाचण्यांबाबत नोटीसमधून माहिती मागविली आहे. आयुष मंत्रालयाच्या परवानगीशिवाय कोरोनीलचा वापर करता येणार नाही, असे राजस्थान सरकारने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, बाबा रामदेव यांनी गुरुवारी बुधवारी कोरोनील औषध लाँच केल्यानंतर काहीच तासात ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. आयुष्य मंत्रालयाने कोरोनीलची जाहिरात व प्रसिद्धी थांबविण्याचे आदेश पंतजलीला दिले. तसेच पतंजलीकडून कोरोनाच्या औषधाबाबत सविस्तर माहितीही आयुष मंत्रालयाने मागविली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.