नवी दिल्ली - कोरोनाचा प्रसार वाढत असताना जागतिक व देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शेअर बाजार गुंतवणूकदारांना भीती आहे. कोरोनाचे देशातील रुग्ण वाढत असताना केंद्र सरकारने ७५ जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित केले आहे. मुंबई शेअर बाजाराच्या अभूतपूर्व घसरणीनंतर गुंतवणूकदारांची अस्वस्थता वाढली आहे.
कोरोनाचे देशातील रुग्ण वाढत असल्याने शेअर बाजार गुंतवणूकदारांनी प्रचंड धसका घेतला आहे. मुंबई शेअर बाजारात ३,९३४.७२ अंशांनी पडझड झाली आहे. ही शेअर बाजारामधील आजपर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली आहे. कोरोनाने उद्भवलेली परिस्थिती आटोक्यात आली नाही तर देशच संपूर्ण ठप्प होण्याची भीती आहे.
दरम्यान, मुंबईतील लॉकडाऊन घोषित करण्यात आले असले तरी शेअर बाजार, बँका, मेडिकल दुकाने व जीवनावश्यक वस्तु पुरविणारी दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत.
मंदावलेली अर्थव्यवस्थेत कोरोनाचा फटका बसल्याने अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी बराच काळ लागेल, अशी गुंतवणूकदारांनी भीती आहे. शेअर बाजारातील ऑटो, एअरलाईन्स, रिटेल अशा सर्वच कंपन्यांवर परिणाम झाला आहे. देशातील रेल्वे सेवा ठप्प होत आहे. सर्वच वाहन कंपन्यांनी उत्पादन थांबविले आहे.
मूडीजचा इशारा-
महामारी कोरोनाने गेल्या पंधरा दिवस देशातील उद्योगांवर परिणाम झाला आहे. तर लोकांना घराबाहेर फिरण्यावर निर्बंध आले आहेत. त्याचा जागतिक आर्थिक चलनवलनावर कायमस्वरुपी वर्षभर परिणाम होणार असल्याचा इशारा मूडीज इनव्हेस्टर्स सर्व्हिसने इशारा दिला आहे. धोरणात्मक सुधारणांमध्ये रोजगार वाचविणे आणि उद्योगांना ढासळण्यापासून वाचविणे यांचा समावेश आहे. वेळेवर प्रतिसाद दिला तर उशीरा दिलेल्या प्रतिसादाहून अर्थव्यवस्थेचे कमी नुकसान होणार आहे.
हेही वाचा-कोरोनाने देशातील सर्व वाहन कंपन्यांच्या उत्पादनाला 'ब्रेक'
आरबीआयची वॉर रुम-
कोरोनाचा प्रसार होत असताना त्याचा परिणाम होवू नये, यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने आभासी वॉर रुम तयार केली आहे. यामध्ये केवळ ९० महत्त्वाचे अधिकारी कार्यरत असणार आहेत. त्यामुळे वित्तीय व्यवस्था सुरळित राहण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जगामध्ये पहिल्यांदाच एखादी मध्यवर्ती बँक बीसीपीची अंमलबजावणी होत असल्याचे आरबीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. तसेच देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी अंमलबजावणी होत आहे. दुसऱ्या महायुद्धातही मध्यवर्ती बँकेने असे कोणतेही नियोजन केले नव्हते.
हेही वाचा-एलआयसी विमा हप्ता भरण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
नोकऱ्यांवर गंडातर
कोरोनाने जगभरातील २.५ कोटी लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागणार असल्याची शक्यता आंतरराष्ट्रीय कामगार संस्थेने (आयएलओ) व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय धोरणात समन्वय झाला तर हे बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल, असे या संस्थेने म्हटले आहे.
कोरोनाने अनेकांवर आर्थिक संकटही येण्याची भीती आहे. कारण देशातील ३.८ कोटी लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे. यामधील ७० टक्के लोक हे पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील असल्याचे पर्यटन क्षेत्रातील संघटनेने म्हटले आहे.
हेही वाचा-' जागतिक अर्थव्यवस्थेच्या चलनवलनावर कोरोनाचा कायमस्वरुपी होणार परिणाम'
कंपन्यांच्या शेअरमध्ये अशी झाली घसरण-
मारुती सुझुकी इंडिया - १७.०२
आयसीआयसीआयसीआय बँक १७.०८
इंडसइंड - २३.५०
बजाज ऑटो फायनान्स - २३.५७
अॅक्सिस बँक - २८.०१