नवी दिल्ली - तुम्ही फेसबुकचा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. २० ते ६० कोटी वापरकर्त्यांच्या पासवर्डमध्ये त्रुटी असल्याचे समोर आले आहे. यावर सायबरसुरक्षा तज्ज्ञांनी गोपनीय आणि सुरक्षिततेसाठी पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिला आहे. पासवर्ड बदलल्यानंतर दोन प्रकारच्या पडताळणी कार्यान्वित करा, असेही सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी म्हटले आहे.
सुमारे ६० कोटी वापरकर्त्यांचे पासवर्ड संग्रहित करताना तसेच अक्षरातच संग्रहित झाल्याचे पत्रकाराने एका अहवालातून समोर आणले आहे. यामुळे हा पासवर्ड फेसबुकच्या सुमारे २० हजार कर्मचाऱ्यांना दिसू शकत होता, असेही अहवालात म्हटले आहे.ही पासवर्डची त्रुटी दूर केल्याचे फेसबुकने गुरुवारी ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे. जर चुकीच्या हातात पासवर्ड गेला तर त्याचा दुरुपयोग होऊ शकतो, असे सायबर सेक्युरिटी कंपनी 'सॉर्फोस'चे वरिष्ठ तंत्रज्ञ पॉल डकलिन यांनी म्हटले आहे.
याप्नकारानंतर अकाउंटमध्ये कोणतीही छेडछाड झाली नसल्याचा फेसबुकने दावा केला आहे. जेव्हा तुम्ही फेसबुकचा वापर करत नसता, तेव्हा लॉग आऊट करणे आवश्यक असते, असे क्विक हिलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी स्पष्ट केले.फेसबुकच्या पासरवर्डचा वापर ई-मेल अथवा बँकिंग अशा दुसऱ्या खात्यासाठी करू नये, असाही सल्ला काटकर यांनी वापरकर्त्यांना दिला.