नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतनात २० टक्के कपातीचा रिपोर्ट हा खोटा असल्याचे केंद्रीय वित्तीय मंत्रालयाने स्पष्ट केले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात व पेन्शनमध्ये कोणतीही कपात होणार नसल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या रक्कम व्यवस्थापनाच्या सूचनांचा वेतन आणि निवृत्तीवेतनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे केंद्रीय वित्तीय मंत्रालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे. हे ट्विट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही शेअर केले आहे.
हेही वाचा-विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय नाही; एअर इंडियाने बुकिंग सुरू केल्यानंतर सरकारचे स्पष्टीकरण
एका वापरकर्त्याने निवृत्तीवेतनात कपात होणार आहे का, असा प्रश्न विचारला होता. त्याला प्रतिक्रिया देताना सीतारामन यांनी म्हटले, की अधिक स्पष्ट माहिती घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल आभारी आहे. निवृत्ती वेतनात कोणतीही कपात होणार नाही.