ETV Bharat / business

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखपदी 'या' महिला अर्थतज्ज्ञाची नियुक्ती

author img

By

Published : Sep 26, 2019, 4:24 PM IST

आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालकपदी निवड होणे हा मोठा सन्मान असल्याची प्रतिक्रिया ख्रिस्टिलिना जॉर्जिया यांनी दिली आहे. जागतिक अर्थव्यवस्था सातत्याने निराशाजनक असताना आयएमएफच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणे ही मोठी जबाबदारी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

संग्रहित-ख्रिस्टिलिना जॉर्जिया

वॉशिंग्टन - विकसनशील अर्थव्यवस्था असणाऱ्या देशामधील व्यक्तीची पहिल्यांदाच आयएमएफच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. बल्गेरियाच्या ख्रिस्टिलिना जॉर्जिया यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालकपदी निवड होणे हा मोठा सन्मान असल्याची प्रतिक्रिया ख्रिस्टिलिना जॉर्जिया यांनी दिली आहे. जागतिक अर्थव्यवस्था सातत्याने निराशाजनक असताना आयएमएफच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणे ही मोठी जबाबदारी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. व्यापारामधील राहिलेला तणाव आणि कर्जाच्या प्रमाणाची वाढलेली पातळी ही ऐतिहासिक (हिस्टॉरिक) आहे. विविध देशांवरील संकटाचे प्रमाण कमी करण्याला तातडीने प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अर्थव्यवस्थेचा दर कमी होताना त्यावर मात करण्यासाठी देशांनी तयार व्हावे, यालाही प्राधान्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-नियामक संस्थेच्या अनिश्चततेने भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरला - आयएमएफ

ख्रिस्टिलिना (वय ६६) या ख्रिस्टीन लेगार्ड यांच्या जागी १ ऑक्टोबरपासून पदभार स्विकारणार आहेत. त्यांची नियुक्ती ५ वर्षासाठी असणार आहे.

ख्रिस्टिलिना यांनी या सांभाळल्या आहेत जबाबदारी-

  • जॉर्जिया यांनी जागतिक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जानेवारी २०१७ पासून काम पाहिले आहे, तर जागतिक बँक गटाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून चालू वर्षात १ फेब्रुवारी ते ८ एप्रिलदरम्यान जबाबदारी सांभाळली आहे.
  • युरोपियन आयोगासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आयुक्त म्हणून जॉर्जिया यांनी २०१० पासून काम केले आहे. त्यानंतर अर्थसंकल्प आणि मानवसंसाधनसाठी उपाध्यक्षही जबाबदारी सांभाळली आहे.
  • जॉर्जिया यांनी अर्थविज्ञानमध्ये (इकॉनॉमिक सायन्स) पीएच.डी आणि राजकीय अर्थशास्त्रामध्ये कला शाखेतील पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. तसेच त्यांनी १९७७ ते १९९१ दरम्यान अध्यापनाचे कामही केले आहे.

हेही वाचा-आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा चीनला इशारा ; अमेरिकेने आयात शुल्क वाढविल्यास विकासदर आणखी घसरणार

आयएमएफ ही १८९ देशांबरोबर काम करणारी संस्था आहे. जागतिक पतधोरण, वित्तीय स्थिरता, आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुविधा देणे आणि गरिबीचे प्रमाण कमी करण्यासाठी आयएमएफ काम करते.

दरम्यान, ख्रिस्टिलिना यांनी भारतामधील नोटाबंदीचे समर्थन करत लोकांना दूरगामी फायदा होणार असल्याचे मत व्यक्त केले होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.