ETV Bharat / business

..त्यामुळे मध्यमवर्गीयांसाठी घरांचे स्वप्न राहणार आवाक्याबाहेरच! - Latest real estate news

सर्व व्यवहार ठप्प झाल्याने घरांच्या किमती कमी होतील, अशी शक्यता महिन्याभरापासून व्यक्त करण्यात येत होती. पण, आता मात्र ही शक्यता धूसर झाली आहे.

Home sales
घर खरेदी
author img

By

Published : Jun 1, 2020, 3:07 PM IST

मुंबई - कोरोनाच्या संकटाचा आणि टाळेबंदीचा बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या परिणामामुळे घरांच्या खरेदीत आणि मागणीत घट झाली आहे. असे असले तरी बांधकाम विकासकांची संघटना क्रेडाई-एमसीएचआय संघटनेने घरांच्या किमती कमी करण्यास नकार दिला आहे.

सर्व व्यवहार ठप्प झाल्याने घरांच्या किमती कमी होतील, अशी शक्यता महिन्याभरापासून व्यक्त करण्यात होती. पण, आता मात्र ही शक्यता धूसर झाली आहे. कारण बांधकाम क्षेत्रावरील संकट दूर करण्यासाठी किमती कमी करून विक्री वाढवणे, हा पर्याय नसल्याची भूमिका क्रेडाई-एमसीएचआय संघटनेने घेतली आहे.

  • ही आहेत संकटे
    टाळेबंदीनंतर देशात 22 मार्चपासून बांधकाम क्षेत्रातील काम बंद आहे. मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या संख्येने प्रकल्प सुरू होते. पण, येथील शेकडो परिसर कंटेंमेंट झोनमध्ये येत असल्याने प्रकल्पाचे काम बंद‌ आहे.
  • विकासकासमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे तो मजुरांच्या उपलब्धीचा. या क्षेत्रातील 65 टक्के मजूर गावी परटले आहेत. हे मजूर लवकर कामावर परतण्याची शक्यता नाही. त्यामुळे प्रकल्पाची कामे यापुढेही बंद राहण्याची अथवा संथ गतीने सुरू राहण्याची शक्यता आहे.

    एकूणच विकसक संकटांत आहेे. त्यांना घराच्या किमती कमी कराव्या लागतील, असा एक निष्कर्ष पुढे येत होता. यामुळे घराचे ग्राहक सुखावले होते. पण आता त्यांच्या घराच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे. कारण क्रेडाई-एमसीएचआयने नुकताच एक अभ्यास अहवाल प्रकाशित केला आहे.

कोरोनामुळे आलेल्या संकटातून सावरण्यासाठी किमती कमी करणे, हा पर्याय नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. किमती कमी केल्याने उलट नुकसान वाढते. असे सांगत किमती कमी करू नका, असा सल्ला यात संघटनेने दिला आहे. त्याचवेळी पुढच्या काळात कोणत्याही सवलती देऊ नका, असेही या अहवालातून सांगण्यात आले आहे. हा सल्ला जर विकासकांनी प्रत्यक्षात आणला तर घरांच्या किमती काही कमी होणार नाहीत.

दरम्यान, विक्री न झालेल्या नवीन घरांची संख्या मुंबई महानगरात देशात सर्वाधिक असल्याचे यापूर्वी एका अहवालातून समोर आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.