नवी दिल्ली - सोन्यासह मौल्यवान धातुंवरील आयात शुल्क वाढिण्याचा प्रस्ताव आज केंद्रिय अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. हे आयात शुल्क सध्या १० टक्के असताना १२.५ टक्के करण्याचा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ठेवला आहे. त्यामुळे सोने आणखी महागणार आहे.
वित्तीय तूट वाढत असताना सोने आयातीमुळे अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण होतो. त्यामुळे सोन्यावरील आयात शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव सीतारमन यांनी अर्थसंकल्पातून ठेवला आहे. नुकताच सोन्याचा प्रति तोळा दर ३४ हजार रुपयांहून अधिक झाला होता.
गेल्या वर्षी भारताने 982 टन सोन्याची आयात केल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यापूर्वी लोकसभेत लेखी उत्तरातून दिली आहे. सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्यासाठी काही व्यापारी प्रतिनिधींनी सादरीकरण केल्याचेही त्यांनी सांगितले होते. भारत हा सोने आयात करणाऱ्या देशामध्ये आघाडीचा देश आहे.