नवी दिल्ली - बीएसएनएलने प्रिपेडच्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. ग्राहकाचा शून्य बॅलन्स असला तरी ५ मेपर्यंत इनकमिंग सुरू राहणार आहे.
सध्या कठीण काळात ग्राहकांना मानवतेच्या दृष्टीकोनातून ५ मेपर्यंत इनकमिंग सुरू ठेवण्यात येणार असल्याचे बीएसएनएलने म्हटले आहे. बीएसएनएलने ग्राहकांना रिचार्जची सेवा देण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे.
हेही वाचा-विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय नाही; एअर इंडियाने बुकिंग सुरू केल्यानंतर सरकारचे स्पष्टीकरण
ग्राहकांनी रिचार्ज करण्यासाठी डिजीटलचा वापर करावा, असे आवाहन बीएसएनएलचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. पुरवार यांनी केले आहे.