ETV Bharat / business

बिटकॉनची जगभरातील बाजारपेठ पोहोचली ७२.७३ लाख कोटी रुपयांवर! - bitcoin prices in world

सध्या एका बिटकॉनसाठी ५५ हजार डॉलर मोजावे लागत आहे. जगभरात १८.६ दशलक्ष बिटकॉन असल्याचे एका अमेरिकन माध्यमाने म्हटले आहे.

बिटकॉन
बिटकॉन
author img

By

Published : Feb 20, 2021, 4:59 PM IST

न्यूयॉर्क - जगभरातील क्रिप्टोचलन बिटकॉनचे मूल्य हे १ लाख कोटी डॉलर (सुमारे ७२.७३ लाख कोटी) रुपये झाले आहे. जगभरात बिटकॉनच्या किमतीने शुक्रवारी नवा उच्चांक गाठला आहे.

सध्या एका बिटकॉनसाठी ५५ हजार डॉलर मोजावे लागत आहे. जगभरात १८.६ दशलक्ष बिटकॉन असल्याचे एका अमेरिकन माध्यमाने म्हटले आहे. वर्षभरात बिटकॉनच्या किमती ८० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार हे क्रिप्टोचलनासाठी उत्साह दाखवित आहेत.

हेही वाचा-सलग १२ दिवस दरवाढ; मुंबईत पेट्रोल ९७ रुपये लिटर!

एथेरम हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे क्रिप्टोचलन आहे. त्याचे जगभरात एकूण २२० अब्ज डॉलर मूल्य आहे. या चलनाचे मूल्यही वर्षभरात दुप्पट झाले आहे. डॉगकॉईन हे डिजीटल चलनाचे मूल्यही वाढले आहे. टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांनी या डिजीटल चलनावर ट्विट केले होते. अमेरिकेमध्ये कॉर्पोरेटमध्ये बिटकॉनला वैधता देण्याविषयी प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये मास्टरकार्ड आणि पेपल आदींचा समावेश आहे.

हेही वाचा-सिमेंटच्या मागणीमध्ये वाढ, किमती स्थिर -मोतीलाल ओसवाल अहवाल

काय आहे बिटकॉन चलन?

  • बिटकॉनची निर्मिती २००९ मध्ये एका अज्ञात व्यक्तीने केली आहे. त्यावरील व्यवहार हे अज्ञाताकडून करण्यात आले होते. त्यासाठी कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थाची गरज नव्हती.
  • बिटकॉन हे डिजीटल चलन आहे.
  • भौतिक वस्तू नसल्याने त्याचा केवळ ऑनलाईनच्या माध्यमातून वापर करणे शक्य आहे.
  • चलनाचे विकेंद्रीकरण आहे. याचा अर्थ हे चलन सरकारच्या मध्यवर्ती बँकेकडून नियंत्रित करणे शक्य नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.