ETV Bharat / business

चीनच्या इशाऱ्यानंतर बिटकॉईनच्या मूल्यात मोठी घसरण - क्रिप्टोकरन्सी चलन मूल्य

गेल्या २४ तासांमध्ये बिटकॉईनचे मूल्य १२ टक्के घसरून ३८,१८० डॉलर राहिले. तर महिनाभरात बिटकॉईनचे मूल्य ३१ टक्क्यांनी घसरल्याने बिटकॉईनने क्रिप्टोकरन्सीमधील पहिले स्थान गमाविले आहे.

Bitcoin
बिटकॉईन
author img

By

Published : May 19, 2021, 9:27 PM IST

नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून पहिल्यांदाच बिटकॉईनचे मूल्य हे ४०,००० हजार डॉलरहून आज कमी झाले आहे. याचवेळी इतर क्रिप्टोचलनाच्या मुल्यातही घसरण झाली आहे.

चीनची मध्यवर्ती बँक असलेल्या पीपल्स बँक ऑफ चायनाने देयक व्यवहार करण्यासाठी डिजीटल कॉईन वापरू नये, अशा इशारा दिला आहे. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी चलनाच्या बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले आहे.

बिटकॉईनने क्रिप्टोकरन्सीमधील पहिले स्थान गमाविले

गेल्या २४ तासांमध्ये बिटकॉईनचे मूल्य १२ टक्के घसरून ३८,१८० डॉलर राहिले. तर महिनाभरात बिटकॉईनचे मूल्य ३१ टक्क्यांनी घसरल्याने बिटकॉईनने क्रिप्टोकरन्सीमधील पहिले स्थान गमाविले आहे. फेब्रुवारीपासून बिटकॉईनचे मूल्य हे ४०,००० डॉलरहून अधिक राहिले आहे.

हेही वाचा-अदानी ग्रुप 'ही' कंपनी २५,५०० कोटी रुपयांना करणार खरेदी

चीनच्या इशाऱ्याने क्रिप्टोकरन्सीच्या मूल्यावर परिणाम
ओंडाचे वरिष्ठ बाजार विश्लेषक जेफ्रे हॉले म्हणाले, की पीपल्स बँक ऑफ चायनाने आभासी चलनाबाबत काल उशीरा इशारा दिला. वित्तीय आणि देयक संस्थांनी व्यवहारात डिजीटल चलननाचा वापर करू नये, असा इशारा चीनने दिला आहे. त्याचे आज सकाळी पडसाद उमटले आहेत.

हेही वाचा-कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाकरिता १ लाख डोस मिळण्याची विप्रोला अपेक्षा

क्रिप्टोकरन्सी बाजारपेठेचे सुमारे १ लाख कोटी डॉलरचे नुकसान

गेल्या काही दिवसांपासून क्रिप्टोकरन्सीमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला आहे. तर सोमवारी क्रिप्टोकरन्सीची मोठी विक्री झाली आहे. क्रिप्टोकरन्सी बाजारपेठेचे सुमारे १ लाख कोटी डॉलरचे नुकसान झाल्याचा तज्ज्ञ अंदाज व्यक्त करित आहेत.

काय आहे क्रिप्टो चलन -

क्रिप्टो हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित चलन आहे. ते अस्थिर असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तीव्र जोखीम असते. विशेषत: क्रिप्टो चलनाच्या किमतीमधील प्रचंड चढ-उतारामुळे गुंतवणूकदारांसाठी तीव्र जोखीम असते. इनक्रिप्ट तंत्रज्ञानाच्या डिजीटल एककामधून क्रिप्टोचा व्यापार केला जातो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.