बार्सेलोना - मोबाईल कंपनी नोकियाने ५ जीची चाचणी भारती एअरटेलबरोबर घेणार असल्याचे जाहीर केले. या 5 जीच्या चाचणीने दूरसंचार कंपनीच्या सेवेत सुधारणा होणार असल्याचे नोकियाने म्हटले आहे.
भारती एअरटेलबरोबर घेण्यात येणारी 5 जीची चाचणी ही महत्त्वाची पूर्वतयारी असल्याचे नोकिया इंडियाचे प्रमुख संजय मलिक यांनी सांगितले. भविष्यातील दूरसंचार नेटवर्कची गरज आणि हायस्पीड डाटाची मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 5 जीच्या चाचणीसाठी अंतिम तारीख ठरविण्यात आली नाही, मात्र त्यासाठी तयारी झाल्याचे नोकियाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
5 Gची अशी आहे तयारी-
फ्रंथुल हे अँटेनाला बसविण्यात आले आहे. त्यातून सिग्नल मिळणे शक्य होते. बेसबँडमधून टेलिकॉमची प्रोसेस होते.
5 जीसाठी नेटवर्कला डाटा प्रोसेस करण्याची प्रचंड क्षमता लागणार आहे. ट्रान्सपोर्ट नेटवर्क हे अपग्रेड करणे गरजेचे आहे. त्यातून मोबाईल ब्रॉडब्रँडची सेवा बळकट होणार आहे. तसेच जागतिक दर्जाची डिजीटल सेवा मिळणार आहे. नोकिया हा आमचा दीर्घकाळाचा भागीदार आहे. 5 जीची सेवा देण्यासाठी आम्ही नोकियाकडून सहकार्य घेणार आहोत, असे भारती एअरटेलचे सीटीओ रणदीप सेखोन यांनी सांगितले.