सरकारी बँक कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; थकलेल्या वेतनातील फरक खात्यावर जमा - युनायटेड फोरम फॉर बँक युनियन्स
एका सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्याने सांगितले की, कर्मचारी थकित वेतनाच्या रक्कमेचा (एरिअर) पर्याय निवडू शकतात. जर त्यांनी हा हिस्सा घेतला तर त्यांना थकित मिळणारी रक्कम ही ५० हजार रुपयांहून कमी असणार नाही. तसेच ही रक्कम १ लाखांहून अधिक असणार नाही.
नवी दिल्ली - सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर खूशखबर मिळाली आहे. दिवाळीपूर्वीच बँक कर्मचाऱ्यांच्या खात्यावर थकलेल्या वेतनाची १२ टक्के रक्कम जमा करण्यात येत आहे. सुधारित वेतन करण्यासाठी कर्मचारी संघटना आणि व्यवस्थापनात अंतिम करार होण्यापूर्वीच बँक कर्मचाऱ्यांना वेतनातील फरकाची रक्कम देण्यात येत आहे. बँकिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे बँक कर्मचाऱ्यांना थकित रक्कम देण्यात येत आहे.
एका सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्याने सांगितले की, कर्मचारी थकित वेतनाच्या रक्कमेचा (एरिअर) पर्याय निवडू शकतात. जर त्यांनी हा हिस्सा घेतला तर त्यांना थकित मिळणारी रक्कम ही ५० हजार रुपयांहून कमी असणार नाही. तसेच ही रक्कम १ लाखांहून अधिक असणार नाही.
बँकेचे कर्मचारी थकित रकमेसाठी २०१७ पासून प्रतिक्षा करत आहेत. नोव्हेंबर २०१७ मध्ये युनायटेड फोरम फॉर बँक युनियन्स, इंडियन बँक असोसिएशन यांच्या चर्चेच्या ३० फेऱ्या झाल्या होत्या. मात्र त्याबाबत कोणताही निर्णय होवू शकला नाही.
एका बँकेच्या कर्माचाऱ्याने सांगितले की, बँकेचे व्यवस्थापन थकित पगाराची रक्कम देण्यासाठी वेगाने काम करत असणे ही चांगली बाब आहे. तर वेतनाचा आढावा घेण्याचे काम होण्यासाठीची चर्चा ही गोगलगायच्या संथगतीने होत आहे.
काही दिवसांपूर्वीच भारतीय बँकिंग असोसिएशनने (आयबीए) वेतनासंदर्भात ११ वी बैठक घेतली होती. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा आगाऊ पगाराएवढी रक्कम (बेसिक आणि डीए) देण्याची सूचना सरकारी व खासगी बँकांच्या प्रमुखांना देण्यात आली होती. वेतनवाढीबाबत तोडगा काढल्यानंतर अंतिम वेतन करताना त्यामध्ये तडजोड करण्याविषयी आयबीएने बँकांना सांगितले होते. बँक व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना १२ टक्के वेतनवाढ देवू केली आहे. त्यामुळे अंतिम वेतनवाढ ही त्याहून कमी येणार नसल्याने बँकांनी थकित फरकाचा हिशोब करून वेतन दिल्याचे सूत्राने सांगितले.
Dummy
Conclusion: