ETV Bharat / business

बजाज ऑटोकडून प्लॅटिना १०० इलेक्ट्रिक स्टार्ट लाँच

author img

By

Published : Mar 2, 2021, 3:58 PM IST

बजाज ईसमध्ये खास ससपेन्शन बसविण्यात आले आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवासही सुखकर होऊ शकतो.

Bajaj latina 100 Electric Start
बजाज प्लॅटिना १०० इलेक्ट्रिक स्टार्ट

नवी दिल्ली - बजाज ऑटोने १०२ सीसी प्लॅटिना ही इलेक्ट्रिक स्टार्टमध्ये (ईएस) लाँच केली आहे. या दुचाकीची किंमत ५३,९२० रुपये (एक्स शोरुम दिल्ली) आहे.

बजाज ईसमध्ये खास ससपेन्शन बसविण्यात आले आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवासही सुखकर होऊ शकतो. दुचाकीस्वारासह त्याच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीलाही दुचाकीवरून आरामदायी प्रवास करता येणे शक्य आहे. दुचाकीचे ट्यूबलेस टायर आहेत. त्यामुळे ग्राहकांना विनात्रास आणि अधिक सुरक्षिततेचा टायरमधून पर्याय मिळतो.

हेही वाचा-'चीनबरोबर आपण व्यापार सुरू ठेवायला हवा'

प्लॅटिना ब्रँडचे ७० दशलक्षांहून अधिक ग्राहक समाधानी असल्याचे बजाज ऑटोच्या मार्केटिंगचे प्रमुख नारायण सुंदररमण यांनी सांगितले. नवीन प्लॅटिना १०० ईसमध्ये किक स्टार्टमधून सेल्फ स्टार्टमध्ये ग्राहकांना अद्ययावत होता येणार असल्याचेही सुंदररमण यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-बजाज ऑटोच्या वाहन विक्रीत जानेवारीत ६ टक्क्यांची घसरण

दरम्यान, बजाज ऑटोच्या वाहनांच्या विक्रीत चालू वर्षात फेब्रुवारीमध्ये ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू वर्षात फेब्रुवारीमध्ये ३ लाख ७५ हजार १७ वाहनांची विक्री झाली आहे. गतवर्षी फेब्रुवारीमध्ये ३ लाख ५४ हजार ९१३ वाहनांची विक्री झाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.