नवी दिल्ली - देशात टाळांबदी ३ एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले आहेत. अशा स्थितीत दैनंदिन लागणाऱ्या वस्तुंची मागणी पूर्तता करण्यात एफएमसीजी कंपन्यांना अडथळे येत आहेत. कारण कंपन्यांकडे पुरेसे कामगार उपलब्ध नाहीत.
केंद्र सरकारने टाळाबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागात उत्पादन सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयाचे एफएमसीजी कंपन्यांनी स्वागत केले आहे. देशभरात टाळाबंदी लागू केल्यानंतर अनेक स्थलांतरित कामगार त्यांच्या मूळगावी परतले आहेत. त्यामुळे अनेक अन्न (फूड) कंपन्या क्षमतेच्या केवळ १५ ते २० टक्के काम करू शकत आहेत. केंद्र सरकारने कृषी, वाहतूक आणि इतर बाबीवरील निर्बंध शिथिल केल्याबद्दल मॅरिको, आयटीसी आणि पारले कंपनीने स्वागत केले आहे.
हेही वाचा-आरोग्य सेतू अॅपने 'हा' केला जागतिक विक्रम
नव्या मार्गदर्शक सूचनेमुळे काही कामगार कामावर परतण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर क्षमतेच्या किमान ३० ते ४० टक्के काम करणे शक्य होईल, असे पारले वरिष्ठ अधिकारी कृष्णराव बुद्ध यांनी सांगितले. सध्या मालाचा कोणताही तुटवडा नसल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा-लॉकडाऊनमध्ये प्रवासी रेल्वे बंद असूनही सरकारने असे कमविले ७.५ कोटी