ETV Bharat / business

'कॅशलेस' प्रणालीतील स्पर्धा आणि संधी.. - भारतातील कॅशलेस व्यवहार

भारत रोकड विरहित डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने निघाला आहे. 'अली-पे' आणि 'वुईचॅट-पे' हे दोन पेमेंट अ‌ॅप चीनी बाजारपेठेत वर्चस्व राखून आहेत तर भारतात गुगल-पे, अमॅझॉन-पे आणि 'पेटीएम'सारखे ८७ अ‌ॅप आहेत. चीनच्या उलट, भारतात अधिक संधी आहे आणि स्टार्टअप वित्तीय सेवा पुरवठादार भारतात पुढे येत आहेत. भारतात डिजिटल पेमेंट २०१५ पासून पाच पटींनी वाढले आहेत.

Article on Competetive Cashless System
'कॅशलेस' प्रणालीतील स्पर्धा आणि संधी..
author img

By

Published : Dec 20, 2019, 1:43 PM IST

अमेरिकेने क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून रोकडविरहित पैसे भरण्याची पद्धत सार्वत्रिक केली आहे. चीनमधील लोक 'डिजिटल वॉलेट्स' आणि 'क्यूआर कोड'चा वापर रक्कम देण्याघेण्यासाठी करत असून मग ते ई-कॉमर्स संकेतस्थळांवर वस्तु खरेदी करणे असो, ऑनलाईन खरेदी असो किंवा महागड्या हॉटेल्समध्ये खाणे असो. आताच ८ कोटी ३० लाख लोकांनी डिजिटल भरणा करण्यासाठी स्मार्टफोन्स आणि समाजमाध्यमांच्या अ‌ॅप्सचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

सर्वात चकित करणारी गोष्ट ही आहे की, चीनमधील भिकारीसुद्धा जनतेकडून भीक स्वीकारण्यासाठी 'क्यूआर कोड्स'चा वापर करू लागले आहेत. चीनमध्ये डिजिटल व्यवहारांची व्याप्ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अलिबाबा (चीनचा अमेझॉन) आणि टेन्सेंट (चीनचे फेसबुक) अशा माध्यमांतील विशाल कंपन्यांनी रक्कम भरण्यासाठी प्रवेशद्वार म्हणून बँकांचे स्थान प्राप्त केले आहे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून रकमेचा भरणा केल्यास घाऊक विक्रेते चिनी बँकांना ०.५ ते ०.६ टक्के प्रक्रिया शुल्क देतात, तर मोबाईल वॉलेट्सच्या माध्यमातून ऑनलाईन रक्कम भरल्यावर केवळ ०.१ टक्के प्रक्रिया शुल्क आहे. याचसाठी गेल्या वर्षी अलिपे (अलिबाबा) आणि वुईचॅटपे (टेन्सेंट) अ‌ॅपच्या माध्यमातून १२.८ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक रकमेचे डिजिटल व्यवहार झाले. जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी निम्मे व्यवहार आज चीनमध्ये होत आहेत.

आफ्रिकेला वरदान..

चीनने सुरू केलेल्य या ऑनलाईन पेमेंट्सच्या क्रांतीचे लोण बँकिंग सुविधांचा तुटवडा असलेल्या असलेल्या आफ्रिकेत झपाट्याने पसरत आहे. चीनने आणलेली गुंतवणूक आणि तंत्रज्ञानामुळे, आफ्रिकेत आज, फोर-जी नेटवर्क, स्मार्टफोन्स, मोबाईलवरून रक्कम अदा करणे सर्रासपणे सुरू झाले आहे. भारतात, यावर्षी प्रथमच ऑक्टोबरमध्ये, युनिफाईड पेमेंट इंटरफेसवरून (युपीआय) केलेल्या व्यवहारांपेक्षा कार्डचा व्यापार कमी झाला. बंगळुरू (३८.१० टक्के) हे गुगल पे, फोनपे आणि भीम अपवरून केलेल्या डिजिटल व्यवहारांमध्ये सर्वोच्च स्थानी असून त्यानंतर हैदराबाद (१२.५० टक्के) आणि दिल्लीचा (१०.२२ टक्के) क्रमांक लागतो. बंगळुरूस्थित डिजिटल पेमेंट करण्याऱ्या रेझॉरपेने ही आकडेवारी उघड केली आहे. अलिबाबा आणि वुईचॅटपे बँकिंग सेवांची जागा घेत असले तरीही, ही दोन मोबाईल वॉलेट्स अजूनही जोडलेली आहेत आणि वापरकर्त्याच्या संबंधित बँक खात्याशी समक्रमित होऊन काम करतात. अमेरिका स्थित कंपनी फेसबुक मूळ बँका आणि स्थानिक चलनांची पर्वा न करता, २०२० मध्ये आपले स्वतःचे डिजिटल क्रिप्टो चलन 'लिब्रा' सुरू करण्याच्या दिशेने कित्येक पावले पुढे आहे. चीनही आपल्या सेंट्रल बँकेच्या माध्यमातून डिजिटल चलन लिब्राच्या धर्तीवर आणण्याच्या दिशेने पावले टाकत असून कदाचित २०२० च्या मध्यास चलनाची सुरूवातही होईल. बाजारपेठ भांडवलीकरणातील जगातील सर्वात मोठी बँक असलेल्या यावर्षी सुरूवातीला, जेपी मॉर्गन चेज अँड कंपनीने, (जेपीएम), या स्पर्धेत उडी घेतली असून स्वतःचे 'कॉईन' हे क्रिप्टो चलन सुरू केले आहे. हे चलन ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारित असून बँक खातेधारकांकडून त्याचा वापर विद्युतगतीने पैसे हस्तांतरित करण्यासाठी केला जातो.

लिब्रा कसे काम करते?

तर, दुसरीकडे फेसबुक लिब्राचे रूपांतर आंतरराष्ट्रीय डिजिटल चलनात प्रवेश करण्याचा उद्देश्य ठेवून आहे. पण जर चीन डिजिटल पेमेंटमध्ये उतरत असेल, तर लिब्राला बँकिंग क्षेत्रातून तसेच अमेरिका आणि युरोपमधील नियामक संस्थांकडून होणाऱ्या विरोधाला सामोरे जावे लागेल.

लिब्रा हे क्रिप्टो चलन आहे. सर्व क्रिप्टो चलने डिजिटल चलने आहेत, परंतु सर्व डिजिटल चलने क्रिप्टो नाहीत. लिब्रा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून रक्कम सुरक्षितपणे आणि अत्यंत वेगाने आणि कोणतेही शुल्क न आकारता हस्तांतरित करू शकते. लिब्राच्या मूल्यामध्ये दुसरे क्रिप्टो चलन असलेल्या बिटकॉईनप्रमाणे चढउतार येत नाहीत. त्याचे अवमूल्यन हे डॉलर, युरो आणि येनवर आधारित आहे. जेव्हा एखादा लिब्रा खरेदी करतो, तेव्हा त्याचे समकक्ष रक्कम डॉलर, येन आणि युरोच्या रूपात बँक खात्यात भरले जातात. या रकमेवर व्याजही येते. लिब्राचे रूपांतर पुन्हा डॉलर आणि युरोत करण्यासाठी, फेसबुक अप कॅलिब्रा विनिमयाचा दर अदा करते.

स्वित्झर्लंडमधील ना-नफा तत्वावरील संघटनेच्या मार्गदर्शनांतर्गत लिब्राचे कार्यचालन होते. जेव्हा लिब्रा अंमलात येते, तेव्हा कोणतीही कंपनी या डिजिटल नाण्याचे वॉलेट बनवू शकते. फेसबुक, त्याची संदेशसेवा आणि व्हॉट्सअप यांचे जगभरात २७ कोटीहून अधिक वापरकर्ते आहेत. त्या सर्वांना लिब्राचे रूपांतर डिजिटल चलनात करण्याची इच्छा आहे ज्यामुळे डिजिटल स्वरूपात रक्कम भरणे, गुंतवणूक करणे आणि उसने देण्यास मदत होईल. फेसबुक-पे पहिल्यांदा पेमेंट सेवा व्यासपीठ म्हणून सुरू करण्यात आले होते. फेसबुकशी संलग्न असलेले व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम आणि मेसेंजरच्या माध्यमातूनही रकमेचे व्यवहार करता येतात.

भारतात व्हॉट्सअपने नुकताच डिजिटल व्यवहारांबाबत एक प्रयोग सुरू केला आहे. शंभर बँका आणि वित्तीय संस्थांना लिब्रा समुदायाचे सदस्य करण्यात आले आहे. जेपी मॉर्गन चेस, पाश्चात्य जगातील सर्वात मोठी बँक असून ती या संघात सामील होण्याची अपेक्षा आहे, पण कंपनीने स्वतःचे जेपीएम कॉईन हे डिजिटल चलन आणले आहे. मास्टरकार्ड, व्हिसा, पेपाल आणि ईबे यांच्यासाठी लिब्रा प्रकल्पापासून दूर जावे लागणार असून हा मोठा धक्का आहे. उबेर आणि स्पॉटीफाय केवळ लिब्राची रक्कम स्वीकारतात. लिब्राचा उपयोग गुन्हेगारी टोळ्या अमली पदार्थांची आणि धनाढ्य लोक बेहिशोबी पैशाची तस्करी करण्यासाठी करतील, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ग्राहक हक्क आणि वित्तीय स्थैर्य याबाबत चिंता व्यक्त होत आहे. याच भीतीमुळे फ्रान्स आणि जर्मनी लिब्राला युरोपमध्ये प्रवेश करू देत नाहीत आणि लिब्रा या खासगी डिजिटल चलनाऐवजी, क्रिप्टो चलन सरकारच्या माध्यमातून चालवण्याचा त्याचा इरादा आहे. अशा वातावरणात लिब्रा जून २०२० मध्ये जारी केले जाईल, ही शक्यता नाही.

डॉलरच्या वर्चस्वावर आळा..

दरम्यान, चीन स्वतःचे क्रिप्टो चलन, सेंट्रल बँकेचे डिजिटल चलन जारी करण्याची तयारी करत आहे. आंतरराष्ट्रीय राखीव चलन म्हणून डॉलरचे वर्चस्व यामुळे धोक्यात येऊ शकते. विशेषतः, आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका यांच्यातील उभरते देश डॉलरकडून आंतरराष्ट्रीय चीनी डिजिटल चलनाकडे वळण्याची शक्यता आहे.

खरे पाहता, चीन आणि अमेरिका यांच्यात व्यावसायिक व्यापार, पाच जी सेवा सुरू करणे, उच्च तंत्रज्ञान क्षेत्रे यात जोरदार स्पर्धा आहे. ही स्पर्धा आता डिजिटल चलनात विस्तारित होईल. बँक ऑफ इंग्लंडनेसुद्घा चीनचे डिजिटल चलन आंतरराष्ट्रीय चलनात रूपांतरित होण्याचा इषारा दिला असून त्यामुळे सर्व आंतरराष्ट्रीय व्यापार आज जो डॉलरमध्ये होत आहे, त्याची जागा घेईल, असे म्हटले आहे. अमेरिका आणि युरोपने लिब्राला परवानगी दिली नाही तर, फेसबुक स्वतःजे डिजिटल चलन आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि आशियात सुरू करेल. भारतात ७२ टक्के ग्राहक व्यवहार अजूनही रोख रकमेच्या रूपात होतात. चीनच्या तुलनेत तर हे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त आहे. किरकोळ विक्रेते अद्यापही गावांमध्ये इंटरनेट सर्वत्र उपलब्ध नसल्याने डिजिटल व्यवहारांकडे वळण्यास घाबरत आहेत. त्यामुळे, दरडोई डिजिटल व्यवहारांची संख्या भारतात अद्यापही उगवत्या अवस्थेतच आहे. २०१७ मध्ये चीनने ९६.७ टक्के रोख व्यवहारांची नोंद केली तर, भारतात २०१५ मध्ये २२.४ टक्के रोखीने व्यवहार झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने २०१६ मध्ये रोखविरहित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बँकेच्या मोठ्या रकमेच्या चलनी नोटा रद्द केल्या असल्या तरीही, गेल्या दोन वर्षात रोख रकमेचा उपयोग कमी झालेला नाही.सध्या, एक कोटी भारतीय युपीआय सेवांचा उपयोग डिजिटल रक्कम भरण्यासाठी करत आहेत. तरीसुद्धा, दिलीप आसबे असे सांगतात की, येत्या पाच वर्षांत किमान पाच कोटी डिजिटल व्यवहारांचे वापरकर्ते राहतील, असे लक्ष्य आहे.

पेटीएमने अलिबाबा समूहाबरोबर अगोदरच भागीदारी केली असून भारतात त्याचा व्यापक उपयोग होत आहे, फेसबुकने व्हॉट्सअपच्या माध्यमातून रक्कम भरण्याचा आणि काढण्याची सेवा विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. रतन टाटा यांची वैयक्तिक गुंतवणूकही पेटीएममध्ये करण्यात येते. चीन आपल्या वित्तीय व्यापारासोबत, फेसबुक आणि इतर खासगी पेमेंट प्रवेशद्वारे(अप्स) भीमसारख्या देशांतर्गत अपशी स्पर्धा करू पाहत आहेत. भारताने नजीकच्या भविष्यात १३० कोटी लोकसंख्येला रोक़डविरहित व्यवहारांकडे वळवायचे असेल तर, कठोर स्पर्धेला सामोरे जायला तयार असले पाहिजे आणि विजेता म्हणून समोर आले पाहिजे. आगामी डिजिटल आर्थिक युगात आपण फार पिछाडीवर राहू नये, यासाठी देशाने मोठी झेप घेतली पाहिजे.

भारताला याची जाणीव झाल्याने, भारत भीम अपच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पावती देण्यासाठी कंबर कसून प्रयत्नाला लागला आहे. सिंगापूर फिनटेक उत्सवात यासंदर्भात एक प्रायोगिक रक्कम अदा करण्याचा व्यवहार पारही पडला.

भारत वेगाने सज्ज होत आहे..

भारत रोकड विरहित डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने निघाला आहे. 'अली-पे' आणि 'वुईचॅट-पे' हे दोन पेमेंट अ‌ॅप चीनी बाजारपेठेत वर्चस्व राखून आहेत तर भारतात गुगल-पे, अमॅझॉन-पे आणि 'पेटीएम'सारखे ८७ अ‌ॅप आहेत. चीनच्या उलट, भारतात अधिक संधी आहे आणि स्टार्टअप वित्तीय सेवा पुरवठादार भारतात पुढे येत आहेत. भारतात डिजिटल पेमेंट २०१५ पासून पाच पटींनी वाढले आहेत.

भारतीय राष्ट्रीय देय संस्थेच्या छत्राखाली (एनसीपीआय), युपीआय झटपट मोबाईल पेमेंट करण्यास सक्षम आहे. विविध बँक खाती पेमेंट अपशी जोडून युपीआयने डिजिटल व्यवहार सुरू केले आहेत. तरीही, रोकडविरहित भुगतान करायचे झाले आणि जागतिक रोकडविरहित बाजारपेठेत ठसा उमटवायचा असेल तर भारताला अजून खूप मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.

हेही वाचा : वापरकर्त्याने सेटिंगमध्ये बदल केला तरी लोकेशनची मिळते माहिती - फेसबुकची कबुली

Intro:Body:

'कॅशलेस' प्रणालीतील स्पर्धा आणि संधी..

अमेरिकेने क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून रोकडविरहित पैसे भरण्याची पद्धत सार्वत्रिक केली आहे. चीनमधील लोक 'डिजिटल वॉलेट्स' आणि 'क्यूआर कोड'चा वापर रक्कम देण्याघेण्यासाठी करत असून मग ते ई-कॉमर्स संकेतस्थळांवर वस्तु खरेदी करणे असो, ऑनलाईन खरेदी असो किंवा महागड्या हॉटेल्समध्ये खाणे असो. आताच ८ कोटी ३० लाख लोकांनी डिजिटल भरणा करण्यासाठी स्मार्टफोन्स आणि समाजमाध्यमांच्या अ‌ॅप्सचा वापर करण्यास सुरूवात केली आहे.

सर्वात चकित करणारी गोष्ट ही आहे की, चीनमधील भिकारीसुद्धा जनतेकडून भीक स्वीकारण्यासाठी 'क्यूआर कोड्स'चा वापर करू लागले आहेत. चीनमध्ये डिजिटल व्यवहारांची व्याप्ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अलिबाबा (चीनचा अमेझॉन) आणि टेन्सेंट (चीनचे फेसबुक) अशा माध्यमांतील विशाल कंपन्यांनी रक्कम भरण्यासाठी प्रवेशद्वार म्हणून बँकांचे स्थान प्राप्त केले आहे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून रकमेचा भरणा केल्यास घाऊक विक्रेते चीनी बँकांना ०.५ ते ०.६ टक्के प्रक्रिया शुल्क देतात, तर मोबाईल वॉलेट्सच्या माध्यमातून ऑनलाईन रक्कम भरल्यावर केवळ ०.१ टक्के प्रक्रिया शुल्क आहे. याचसाठी गेल्या वर्षी अलिपे (अलिबाबा) आणि वुईचॅटपे (टेन्सेंट) अ‌ॅपच्या माध्यमातून १२.८ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक रकमेचे डिजिटल व्यवहार झाले. जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी निम्मे व्यवहार आज चीनमध्ये होत आहेत.

आफ्रिकेला वरदान..

चीनने सुरू केलेल्य या ऑनलाईन पेमेंट्सच्या क्रांतीचे लोण बँकिंग सुविधांचा तुटवडा असलेल्या  असलेल्या आफ्रिकेत झपाट्याने पसरत आहे. चीनने आणलेली गुंतवणूक आणि तंत्रज्ञानामुळे, आफ्रिकेत आज, फोर-जी नेटवर्क, स्मार्टफोन्स, मोबाईलवरून रक्कम अदा करणे सर्रासपणे सुरू झाले आहे. भारतात, यावर्षी प्रथमच ऑक्टोबरमध्ये, युनिफाईड पेमेंट इंटरफेसवरून (युपीआय) केलेल्या व्यवहारांपेक्षा कार्डचा व्यापार कमी झाला. बंगळुरू (३८.१० टक्के) हे गुगल पे, फोनपे आणि भीम अपवरून केलेल्या डिजिटल व्यवहारांमध्ये सर्वोच्च स्थानी असून त्यानंतर हैदराबाद (१२.५० टक्के) आणि दिल्लीचा (१०.२२ टक्के) क्रमांक लागतो. बंगळुरूस्थित डिजिटल पेमेंट करण्याऱ्या रेझॉरपेने ही आकडेवारी उघड केली आहे. अलिबाबा आणि वुईचॅटपे बँकिंग सेवांची जागा घेत असले तरीही, ही दोन मोबाईल वॉलेट्स अजूनही जोडलेली आहेत आणि वापरकर्त्याच्या संबंधित बँक खात्याशी समक्रमित होऊन काम करतात. अमेरिका स्थित कंपनी फेसबुक मूळ बँका आणि स्थानिक चलनांची पर्वा न करता, २०२० मध्ये आपले स्वतःचे डिजिटल क्रिप्टो चलन 'लिब्रा' सुरू करण्याच्या दिशेने कित्येक पावले पुढे आहे. चीनही आपल्या सेंट्रल बँकेच्या माध्यमातून डिजिटल चलन लिब्राच्या धर्तीवर आणण्याच्या दिशेने पावले टाकत असून कदाचित २०२० च्या मध्यास चलनाची सुरूवातही होईल. बाजारपेठ भांडवलीकरणातील जगातील सर्वात मोठी बँक असलेल्या यावर्षी सुरूवातीला, जेपी मॉर्गन चेज अँड कंपनीने, (जेपीएम), या स्पर्धेत उडी घेतली असून स्वतःचे 'कॉईन' हे क्रिप्टो चलन सुरू केले आहे. हे चलन ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारित असून बँक खातेधारकांकडून त्याचा वापर विद्युतगतीने पैसे हस्तांतरित करण्यासाठी केला जातो.

लिब्रा कसे काम करते?

तर, दुसरीकडे फेसबुक लिब्राचे रूपांतर आंतरराष्ट्रीय डिजिटल चलनात प्रवेश करण्याचा उद्देश्य ठेवून आहे. पण जर चीन डिजिटल पेमेंटमध्ये उतरत असेल, तर लिब्राला बँकिंग क्षेत्रातून तसेच अमेरिका आणि युरोपमधील नियामक संस्थांकडून होणाऱ्या विरोधाला सामोरे जावे लागेल.

लिब्रा हे क्रिप्टो चलन आहे. सर्व क्रिप्टो चलने डिजिटल चलने आहेत, परंतु सर्व डिजिटल चलने क्रिप्टो नाहीत. लिब्रा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून रक्कम सुरक्षितपणे आणि अत्यंत वेगाने आणि कोणतेही शुल्क न आकारता हस्तांतरित करू शकते. लिब्राच्या मूल्यामध्ये दुसरे क्रिप्टो चलन असलेल्या बिटकॉईनप्रमाणे चढउतार येत नाहीत. त्याचे अवमूल्यन हे डॉलर, युरो आणि येनवर आधारित आहे. जेव्हा एखादा लिब्रा खरेदी करतो, तेव्हा त्याचे समकक्ष रक्कम डॉलर, येन आणि युरोच्या रूपात बँक खात्यात भरले जातात. या रकमेवर व्याजही येते. लिब्राचे रूपांतर पुन्हा डॉलर आणि युरोत करण्यासाठी, फेसबुक अप कॅलिब्रा विनिमयाचा दर अदा करते.

स्वित्झर्लंडमधील ना-नफा तत्वावरील संघटनेच्या मार्गदर्शनांतर्गत लिब्राचे कार्यचालन होते. जेव्हा लिब्रा अंमलात येते, तेव्हा कोणतीही कंपनी या डिजिटल नाण्याचे वॉलेट बनवू शकते. फेसबुक, त्याची संदेशसेवा आणि व्हॉट्सअप यांचे जगभरात २७ कोटीहून अधिक वापरकर्ते आहेत. त्या सर्वांना लिब्राचे रूपांतर डिजिटल चलनात करण्याची इच्छा आहे ज्यामुळे डिजिटल स्वरूपात रक्कम भरणे, गुंतवणूक करणे आणि उसने देण्यास मदत होईल. फेसबुक-पे पहिल्यांदा पेमेंट सेवा व्यासपीठ म्हणून सुरू करण्यात आले होते. फेसबुकशी संलग्न असलेले व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम आणि मेसेंजरच्या माध्यमातूनही रकमेचे व्यवहार करता येतात.

भारतात व्हॉट्सअपने नुकताच डिजिटल व्यवहारांबाबत एक प्रयोग सुरू केला आहे. शंभर बँका आणि वित्तीय संस्थांना लिब्रा समुदायाचे सदस्य करण्यात आले आहे. जेपी मॉर्गन चेस, पाश्चात्य जगातील सर्वात मोठी बँक असून ती या संघात सामील होण्याची अपेक्षा आहे, पण कंपनीने स्वतःचे जेपीएम कॉईन हे डिजिटल चलन आणले आहे. मास्टरकार्ड, व्हिसा, पेपाल आणि ईबे यांच्यासाठी लिब्रा प्रकल्पापासून दूर जावे लागणार असून हा मोठा धक्का आहे. उबेर आणि स्पॉटीफाय केवळ लिब्राची रक्कम स्वीकारतात. लिब्राचा उपयोग गुन्हेगारी टोळ्या अमली पदार्थांची आणि धनाढ्य लोक बेहिशोबी पैशाची तस्करी करण्यासाठी करतील, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ग्राहक हक्क आणि वित्तीय स्थैर्य याबाबत चिंता व्यक्त होत आहे. याच भीतीमुळे फ्रान्स आणि जर्मनी लिब्राला युरोपमध्ये प्रवेश करू देत नाहीत आणि लिब्रा या खासगी डिजिटल चलनाऐवजी, क्रिप्टो चलन सरकारच्या माध्यमातून चालवण्याचा त्याचा इरादा आहे. अशा वातावरणात लिब्रा जून २०२० मध्ये जारी केले जाईल, ही शक्यता नाही.

डॉलरच्या वर्चस्वावर आळा..

दरम्यान, चीन स्वतःचे क्रिप्टो चलन, सेंट्रल बँकेचे डिजिटल चलन जारी करण्याची तयारी करत आहे. आंतरराष्ट्रीय राखीव चलन म्हणून डॉलरचे वर्चस्व यामुळे धोक्यात येऊ शकते. विशेषतः, आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका यांच्यातील उभरते देश डॉलरकडून आंतरराष्ट्रीय चीनी डिजिटल चलनाकडे वळण्याची शक्यता आहे.

खरे पाहता, चीन आणि अमेरिका यांच्यात व्यावसायिक व्यापार, पाच जी सेवा सुरू करणे, उच्च तंत्रज्ञान क्षेत्रे यात जोरदार स्पर्धा आहे. ही स्पर्धा आता डिजिटल चलनात विस्तारित होईल. बँक ऑफ इंग्लंडनेसुद्घा चीनचे डिजिटल चलन आंतरराष्ट्रीय चलनात रूपांतरित होण्याचा इषारा दिला असून त्यामुळे सर्व आंतरराष्ट्रीय व्यापार आज जो डॉलरमध्ये होत आहे, त्याची जागा घेईल, असे म्हटले आहे. अमेरिका आणि युरोपने लिब्राला परवानगी दिली नाही तर, फेसबुक स्वतःजे डिजिटल चलन आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि आशियात सुरू करेल. भारतात ७२ टक्के ग्राहक व्यवहार अजूनही रोख रकमेच्या रूपात होतात. चीनच्या तुलनेत तर हे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त आहे. किरकोळ विक्रेते अद्यापही गावांमध्ये इंटरनेट सर्वत्र उपलब्ध नसल्याने डिजिटल व्यवहारांकडे वळण्यास घाबरत आहेत. त्यामुळे, दरडोई डिजिटल व्यवहारांची संख्या भारतात अद्यापही उगवत्या अवस्थेतच आहे. २०१७ मध्ये चीनने ९६.७ टक्के रोख व्यवहारांची नोंद केली तर, भारतात २०१५ मध्ये २२.४ टक्के रोखीने व्यवहार झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने २०१६ मध्ये रोखविरहित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बँकेच्या मोठ्या रकमेच्या चलनी नोटा रद्द केल्या असल्या तरीही, गेल्या दोन वर्षात रोख रकमेचा उपयोग कमी झालेला नाही.सध्या, एक कोटी भारतीय युपीआय सेवांचा उपयोग डिजिटल रक्कम भरण्यासाठी करत आहेत. तरीसुद्धा, दिलीप आसबे असे सांगतात की, येत्या पाच वर्षांत किमान पाच कोटी डिजिटल व्यवहारांचे वापरकर्ते राहतील, असे लक्ष्य आहे.

पेटीएमने अलिबाबा समूहाबरोबर अगोदरच भागीदारी केली असून भारतात त्याचा व्यापक उपयोग होत आहे, फेसबुकने व्हॉट्सअपच्या माध्यमातून रक्कम भरण्याचा आणि काढण्याची सेवा विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. रतन टाटा यांची वैयक्तिक गुंतवणूकही पेटीएममध्ये करण्यात येते. चीन आपल्या वित्तीय व्यापारासोबत, फेसबुक आणि इतर खासगी पेमेंट प्रवेशद्वारे(अप्स) भीमसारख्या देशांतर्गत अपशी स्पर्धा करू पाहत आहेत. भारताने नजीकच्या भविष्यात १३० कोटी लोकसंख्येला रोक़डविरहित व्यवहारांकडे वळवायचे असेल तर, कठोर स्पर्धेला सामोरे जायला तयार असले पाहिजे आणि विजेता म्हणून समोर आले पाहिजे.  आगामी डिजिटल आर्थिक युगात आपण फार पिछाडीवर राहू नये, यासाठी देशाने मोठी झेप घेतली पाहिजे.

भारताला याची जाणीव झाल्याने, भारत भीम अपच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पावती देण्यासाठी कंबर कसून प्रयत्नाला लागला आहे. सिंगापूर फिनटेक उत्सवात यासंदर्भात एक प्रायोगिक रक्कम अदा करण्याचा व्यवहार पारही पडला.

भारत वेगाने सज्ज होत आहे..

भारत रोकड विरहित डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने निघाला आहे. अलिपे आणि वुईचॅटपे हे दोन पेमेंट अप चीनी बाजारपेठेत वर्चस्व राखून आहेत तर भारतात गुगल-पे, अमॅझॉन-पे आणि 'पेटीएम'सारखे ८७ अ‌ॅप आहेत. चीनच्या उलट, भारतात अधिक संधी आहे आणि स्टार्टअप वित्तीय सेवा पुरवठादार भारतात पुढे येत आहेत. भारतात डिजिटल पेमेंट २०१५ पासून पाच पटींनी वाढले आहेत.

भारतीय राष्ट्रीय देय संस्थेच्या छत्राखाली (एनसीपीआय), युपीआय झटपट मोबाईल पेमेंट करण्यास सक्षम आहे. विविध बँक खाती पेमेंट अपशी जोडून युपीआयने डिजिटल व्यवहार सुरू केले आहेत. तरीही, रोकडविरहित भुगतान करायचे झाले आणि जागतिक रोकडविरहित बाजारपेठेत ठसा उमटवायचा असेल तर भारताला अजून खूप मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.