नवी दिल्ली/लंडन- आर्सेलरमित्तल या जगातली सर्वात मोठ्या स्टील कंपनीने २० टक्के कर्मचारी कॉर्पोरेट कार्यालयातून कपात करणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनीने १ अब्ज डॉलरच्या खर्च कपातीचा कार्यक्रमही जाहीर केला आहे.
आर्सेलरमित्तल ही स्टील आणि खाणींमधील आघाडीची कंपनी आहे. या कंपनीचे ६० देशांमध्ये कामकाज चालते. तर १७ देशांमध्ये स्टील निर्मितीचे कारखाने आहेत. जगभरात आर्सेलरमित्तलमध्ये १ लाख ९० हजार कर्मचारी काम करतात. कोरोना काळात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपनीने खर्चात कपात केली आहे. यामध्ये कॉर्पोरेटमधील कर्मचाऱ्यांच्या संख्येत २० टक्के कपात व कंत्राटदारांची कमी संख्या करणे आदींचा समावेश आहे.
हेही वाचा-सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ
उत्पादकता आणि दळणवळणात केलेल्या बदलामुळे कंपनीला खर्चात ४० टक्के बचत होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी कंपनीकडून उत्पादकतेमध्ये सुधारणा, देखभालीची कार्यक्षमता आणि कामात एकसमानता आणणे अशी पावले उचलण्यात येत आहे.
हेही वाचा-चंदा कोचर यांना ईडी विशेष न्यायालयाकडून पाच लाखांच्या जातमुचकल्यावर जामीन
दरम्यान, कोरोना व टाळेबंदीमुळे जगभरातील विविध क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे.