सॅन फ्रान्सिस्को - कोविड-19 प्रकरणांमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे अॅपलने कॅलिफोर्नियामधील सर्व 53 स्टोअर आणि लंडनमध्ये असलेलीही अनेक स्टोअर्स तात्पुरती बंद केली आहेत.
जगभरात अमेरिकेतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या सर्वाधिक आहे. कोविडमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 18 टक्के मृत्यू फक्त अमेरिकेमध्येच झाले आहेत.
9टू5 मॅक मधील अहवालानुसार, अॅपलने अमेरिकेच्या अनेक स्टोअर्ससह कॅलिफोर्नियाची सर्व किरकोळ स्टोअर्स तात्पुरती बंद केली आहेत. याशिवाय मेक्सिकोची दोन्ही स्टोअर्स आणि ब्राझीलची दोन्ही स्टोअर्स बंद झाली आहेत. तसेच, ब्रिटनमधील 16 स्टोअर्स बंद होणार आहेत.
हेही वाचा - 'कोरोनानंतरच्या जगात भारताकरिता अगणित संधी उपलब्ध होणार'
कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, 'कोविड - 19 च्या परिस्थितीत काही ठिकाणची आमची स्टोअर्स आम्ही तात्पुरती बंद करीत आहोत.'
कॅलिफोर्निया राज्याने साथीचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये प्रथमच आणीबाणीचा इशारा दिला आहे.
मार्चमध्ये महामारी पसरल्यानंतर अॅपलने ग्रेटर चायनाबाहेरची आपली सर्व किरकोळ स्टोअर्स बंद केली. नंतर, साथीच्या रोगामुळे घातलेले निर्बंध कमी केल्यावर अनेक देशांतील स्टोअर्स सुरू झाले.
हेही वाचा - पतमानांकनात सुधारणेचा येस बँकेला फायदा; शेअरच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ