ETV Bharat / business

अमूलच्या दुध दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ, उद्यापासून होणार नवे दर लागू

नव्या दराची अंमलबजावणी ही २१ मेनंतर होणार असल्याचे जीसीएमएमएफने म्हटले आहे. ही दरवाढ दिल्ली, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तरांचल, महाराष्ट्र आणि इतर राज्यात होणार असल्याचे जीसीएमएमएफने म्हटले आहे.

अमूल
author img

By

Published : May 20, 2019, 6:19 PM IST

नवी दिल्ली - तुम्हाला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या दुधाच्या खर्चासाठी अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. कारण दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या अमूलने प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ राजधानी, महाराष्ट्रासह इतर राज्यात उद्यापासून लागू होणार आहे.

अमूल या ब्रँडच्या नावाने गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशन (जीसीएमएमएफ) ही दुधाची विक्री करते. या सहकारी संस्थेने दोन वर्षापूर्वी मार्च २०१७ मध्ये दुधाचे दर वाढविले होते.

नव्या दराची अंमलबजावणी ही २१ मेनंतर होणार असल्याचे जीसीएमएमएफने म्हटले आहे. ही दरवाढ दिल्ली, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तरांचल, महाराष्ट्र आणि इतर राज्यात होणार असल्याचे जीसीएमएमएफने म्हटले आहे.

असे असतील नवे दर-
अर्धा लिटरचे अमूल गोल्ड हे २७ रुपयांना, अमूल शक्ती हे २५ रुपयांना, अमूल डायमंड हे २८ रुपयांना तर अमूल ताजा हे २१ रुपयांना अहमदाबादमधील बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे.

गायीच्या दुधाच्या किमतीत कोणताही बदल नसल्याचे जीसीएमएमएफने म्हटले आहे. दूध उत्पादकांना चांगला खरेदी दर देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सहकारी संस्थेने म्हटले आहे. उत्पादन खर्च वाढल्याने काही महिन्यापूर्वी दूध उत्पादक संघटनांनी दर वाढविल्याचेही संस्थेने म्हटले आहे.

नुकताच अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस. सोधी यांनी यंदा व्यवसाय व उत्पादनांच्या किमती अशा दोन्हीत वाढ होईल, असे म्हटले होते. अनेक राज्यात दुधाच्या किंमती घसरल्या असताना शेतकऱ्यांना अमूलकडून दुधाचा जास्त दर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

Intro:Body:

Buz 01

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.