नवी दिल्ली - कोरोना प्रसार वाढत असल्याने दैनंदिन वस्तुंसाठी ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने प्रयत्न सुरू केले आहेत.
अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या उत्पादने संपल्याचे अॅमेझॉनने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे. यामध्ये विशेषत: दैनंदिन लागणाऱ्या वस्तुंचा समावेश आहे. सर्व उत्पादने ग्राहकांना पुरविण्यासाठी भागीदारांबरोबर सतत काम करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-दिलासादायक! कंपन्यांनी साबणांच्या किमती कमी करून वाढविले उत्पादन
पुरवठा साखळी सुरक्षित असल्याचा फ्लिपकार्टच्या प्रवक्त्याने दावा केला आहे. सध्याची परिस्थिती अभूतपूर्व आहे. परिस्थिती सामान्य राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.
हेही वाचा-कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर करा, सरकारच्या उद्योगांना सूचना
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानीमधील सर्व मॉल बंद करण्याचे शुक्रवारी आदेश दिले आहेत. बंदमधून केवळ जीवनाश्यक वस्तू, भाजीपाल्याची दुकाने आणि मेडिकलची दुकाने यांना वगळण्यात आले आहे. मुंबई, औरंगाबाद,नागपूर व पुणे या शहरातील दुकाने, मॉल, जीम आणि चित्रपटगृह बंद ठेवण्यात आली आहेत.