सॅनफ्रान्सिस्को – कोरोना महामारीत गुगलची मालकी असलेल्या अल्फाबेटलाही आर्थिक फटका बसला आहे. अल्फाबेटचे पहिल्यांदाच एप्रिल ते जूनच्या तिमाहीत उत्पन्न घसरले आहे. अल्फाबेटचे उत्पन्न मागील आर्थिक वर्षाच्या तिमाहीच्या तुलनेत एप्रिल-जूनच्या कालावधीत 1.7 टक्क्यांनी घसरून 38.3 अब्ज डॉलर झाले आहे.
अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले, की या अनिश्चितेच्या काळात लोकांना, उद्योगांना आणि समुदायाला मदत करण्यावर आम्ही काम करत आहोत. अनेकजण ऑनलाइन व्यवसाय करण्याकडे वळत आहेत. काहीजण गुगल क्लाउडवरून गुगल प्ले व युट्यूबकडे वळत आहेत. विविध व्यवसाय सुरू ठेवण्याकरता आम्ही सेवा देत मदत करत आहोत.
गुगल सर्च आणि इतर उत्पादनांच्या विक्रीत 9.8 टक्क्यांनी घसरण होवून 21.3 अब्ज डॉलरची विक्री झाली आहे. यु ट्युबच्या जाहिरातीत 5.8 टक्क्यांची वाढ होवून 3.81 अब्ज डॉलरचा व्यवसाय झाला आहे.
सर्वाधिक गुगल क्लाउडच्या महसुलात 43 टक्क्यांनी वाढ होवून 3 अब्ज डॉलरचा व्यवसाय झाला आहे. कंपनीने सर्व व्यवसायामधून 38.3 अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळविले आहे. कंपनीने जाहिरातींच्या व्यवसायात अशंत: सुधारणा केल्याचे अल्फाबेट आणि गुगलचे मुख्य वित्तीय अधिकारी रुथ पोराट यांनी सांगितले.
जागतिक आर्थिक वातावरणाची स्थिती संकटात आहे. अशा स्थितीमधून आम्ही जात असताना 28 अब्ज डॉलरचे शेअर बायबॅक घेण्याची परवानगी दिल्याचे मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांनी सांगितले.