नवी दिल्ली – एअर इंडियापाठोपाठ एअर इंडिया एक्स्प्रेसने वैमानिकांसह कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांत 40 टक्क्यांनी कपात केली आहे. कोरोनाच्या संकटात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या उत्पन्नात 88 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांत कपात केली आहे.
एअर इंडियाने कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामधील कपातीसाठी लागू केलेल्या योजनेप्रमाणे एअर इंडिया एक्स्प्रेसनेही योजना लागू केली आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसचे मनुष्यबळ विभागाचे प्रमुख टी. विजयकृष्णन यांनी 5 ऑगस्टला कार्यालयीन परिपत्रक काढून भत्त्यांतील कपात लागू केली आहे. कंपनीच्या उत्पन्नात घसरण झाली असताना पुरवठादारांसह इतरांना पैसे द्यावे लागतात. या गरजेची पूर्तता करण्यासाठी कंपनीला खेळत्या भांडवलात वाढ करावी लागणार आहे. त्यामुळे कंपनीने पुरवठादारांना द्याव्या लागणाऱ्या पैशांची रक्कम तडजोडीने कमी केली आहे.
एअर इंडियाप्रमाणे एअर इंडिया एक्स्प्रेसने भत्त्यांत कपात करावे, असे केंद्रीय नागरिक वाहतूक मंत्रालयाने निर्देश दिले होते.
अशी होणार भत्त्यांत कपात
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या वैमानिकांच्या भत्त्यांत 40 टक्क्यांची कपात होणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन 25 रुपयांपर्यंत वेतन आहे, त्यांच्या भत्त्यांत कपात होणार आहे. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भत्त्यांत 5 टक्के तर त्याहून वरिष्ठ असलेले कर्मचारी ते सीईओपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या भत्त्यांत 7.5 टक्क्यांची कपात होणार आहे. वेतनाबरोबर मिळणाऱ्या भत्त्यांतील कपात ही 1 एप्रिलपासून लागू होणार आहे.