ETV Bharat / business

फेसबुकनंतर लिंक्डइनकडून ५० कोटी जणांचा डाटा लिक - Facebook Data Breach

लिंक्डइनवरील 50 कोटी प्रोफाईलचा डाटा हा प्रसिद्ध अशा हॅकर फोरममध्ये बेकायदेशीरपणे विक्रीला ठेवण्यात आला. वापरकर्त्यांचा डाटा असलेल्या चार फाईल्समध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती आहे.

Linkdedin
लिंक्डइन
author img

By

Published : Apr 9, 2021, 3:33 PM IST

नवी दिल्ली - समाज माध्यमात वापरकर्त्यांचा डाटा लिक होण्याचे प्रकार अजूनही थांबलेले नाहीत. फेसबुकच्या वापरकर्त्यांना डाटा लिक होणे अजून पचनी पडलेले नसताना लिंक्डइनकूडन डाटा लिक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तोही थोडाथोडका नाही, तर सुमारे 50 कोटी जणांचा डाटा लिंक्डइनवरून लिक झाला आहे.

लिंक्डइनवरील 50 कोटी प्रोफाईलचा डाटा हा प्रसिद्ध अशा हॅकर फोरममध्ये बेकायदेशीरपणे विक्रीला ठेवण्यात आला. वापरकर्त्यांचा डाटा असलेल्या चार फाईल्समध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. यामध्ये वापरकर्त्यांचे संपूर्ण नाव, ईमेल पत्ते, फोन क्रमांक, जागेच्या ठिकाणाची माहिती आदीचा समावेश आहे. एवढेच नाही तर, त्यामध्ये लिंक्डइन आयडी, लिंग, सोशल मीडिया फ्रोफाईल अशी माहितीदेखील आहे.

हेही वाचा-मुकेश अंबानी सेबीच्या दंडाविरोधात दाखल करणार अपील

लिंक्डइनवरील डाटा लिक झाल्याबाबतच्या दाव्याबाबत तपास केला जात असल्याचे कंपनीने गुरुवारी म्हटले आहे. मात्र, हा डाटा विविध वेबसाईट आणि कंपन्यांकडून गोळा करण्यात आल्याचेही कंपनीने खुलाशात म्हटले आहे. त्या डाटामध्ये लिंक्डइनवरील लोकांचा सार्वजनिक डाटा आहे. त्यामुळे हा डाटा लिक झाला नाही. तसेच लिंक्डइनवरील खासगी अकाउंटचा डाटाही लिक झाला नाही, असा कंपनीने दावा केला आहे.

हेही वाचा-ऐन महामारीत डाळीसह पालेभाज्या महाग; गृहिणींचे कोसळले बजेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.