ETV Bharat / business

कोरोनाशी लढा: एशियन डेव्हलपमेंट बँकेचे भारताला १.५ अब्ज डॉलरचे कर्ज मंजूर - एशियन डेव्हलपमेंट बँक

देशामधील कोरोनाचा प्रसार थांबविणे, गरिबांना सामाजिक संरक्षण आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना मदत करण्यासाठी कर्ज मंजूर केल्याचे एडीबीने म्हटले आहे.

एशियन डेव्हलपमेंट बँक
एशियन डेव्हलपमेंट बँक
author img

By

Published : Apr 28, 2020, 8:13 PM IST

नवी दिल्ली - एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) १.५ अब्ज डॉलरचे कर्ज भारताला मंजूर केले आहे. कोरोनाच्या संकटात भारताला लढण्यासाठी हे कर्ज देण्यात येणार आहे.

देशामधील कोरोनाचा प्रसार थांबविणे, गरिबांना सामाजिक संरक्षण आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना मदत करण्यासाठी कर्ज मंजूर केल्याचे एडीबीने म्हटले आहे. अभूतपूर्व अशा आव्हानाला सामोरे जाताना भारत सरकारला सहकार्य करण्यासाठी बांधील असल्याचे एडीबी बँकेचे अध्यक्ष मॅसाट्सुगू अॅसाकावा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-आयटीत यंदा नव्या नोकऱ्या नाहीत; 'या' कर्मचाऱ्यांचे वेतन कपात होण्याची शक्यता

मोठ्या प्रमाणात पॅकेज देणे हा सरकारशी समन्वय करण्याचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. मॅसाट्सुगू अॅसाकावा म्हणाले, की आम्ही कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी भारताने आखलेल्या कार्यक्रमाला मदत करणार आहोत. ते गरीब भारतीयांना परिणामकारक मदत करतील, अशी अपेक्षा असल्याचे एडीबी बँकेचे अध्यक्षांनी म्हटले आहे.

हेही वाचा-कोरोनाविरोधातील लढ्यात कोका कोला करणार 'इतकी' तुफानी मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.