नवी दिल्ली - गेल्या नऊ तिमाहीत (2018ची तिसर्या तिमाही ते 2020ची पहिली तिमाही) 5 कोटी स्मार्टफोनची विक्री करून बाजारात एक उदयोन्मुख ब्रँड म्हणून रियलमी पुढे आला आहे, असे शुक्रवारी कंपनीसंबंधीच्या नव्या अहवालातून समोर आले आहे.
हेही वाचा - ह्युंदाई मोटर इंडिया 5 नोव्हेंबरला लाँच करणार 'ऑल-न्यू आय 20'
काऊंटर पॉइंटच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, रिअलमीने 1.48 कोटी स्मार्टफोनच्या त्रैमासिक विक्रीसह इतिहास रचला आहे आणि तिसऱ्या तिमाहीत जगातील सर्वात वेगवान विकसनशील स्मार्टफोन ब्रँड म्हणूनही तो उदयास आला आहे. गेल्या तिमाहींदरम्यान 132 टक्क्यांपर्यंत याची विक्री वाढली आहे.
रिअलमी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'या कामगिरीने हे सिद्ध होते की, आमच्या उत्पादनास ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. नव्याने सुरू झालेल्या उत्पादनांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. माणसाच्या जीवनशैलीशी संबंधित एक उत्तम तंत्रज्ञान कंपनी बनण्याच्या आमच्या प्रवासातील हा निश्चितच एक मैलाचा दगड आहे. सध्या भारतात आमच्या ब्रँडचे 30 दशलक्ष वापरकर्ते आहेत.'
हेही वाचा - सॅमसंगची भारतासह इतर प्रमुख देशांत यंदाच्या तिसर्या तिमाहीत 8.8 दशलक्ष हँडसेटची विक्री