हैदराबाद – केंद्र सरकारने बंदी लागू केलेल्या 59 चिनी अॅपपैकी काही अॅप देशात चांगलेच लोकप्रिय होते. हे 59 अॅप जानेवारी 2014 पासून 5 अब्ज डाऊनलोड झाले होते.
अॅप विश्लेषक कंपनी सेन्सर टॉवरच्या माहितीनुसार जानेवारी 2014 पासून 59 अॅपचे डाऊनलोडिंगचे प्रमाण 4.9 अब्ज एवढे होते. यामध्ये टिकटॉक व्हिडिओ शेअरिंग अॅपचा एकूण डाऊनलोडमध्ये ३० टक्के हिस्सा राहिला होता. टिकटॉकचे देशात सर्वाधिक 611 दशलक्ष डाऊनलोड झाले होते. टिकटॉकचे फक्त डाऊनलोडचेे जास्त प्रमाण नव्हते तर त्याचे वापरकर्तेही सक्रिय होते. अॅप बंदीला कायद्याचा आधार केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील 69 ए तरतुदीनुसार चिनी अॅपवर बंदी लागू केली आहे. या कायद्यानुसार सरकारला संगणकीय माध्यमातील माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे रोखण्यात येण्याचे अधिकार आहेत.
गुगल आणि अॅपलने सरकारने बंदी लागू केलेले 59 अॅप स्टोअरवरून हटविले आहेत. तर त्यापूर्वीच टिकटॉक दोन्ही अॅप स्टोअरमधून काढले आहे. इंटरनेट पुरवठादार कंपन्या आणि दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्यांनी बंद करण्यात आलेल्या अॅपचा डाटा इंटरनेटवरून काढण्यासाठी सरकारी अधिकारी कंपन्यांशी चर्चा करत आहेत. हे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बंदी लागू केलेले अॅप इंटरनेटवर दिसणे पूर्ण बंद होणार आहे.
दरम्यान, भारत आणि चीनमध्ये तणावाची स्थिती आहे. चिनी अॅप हे देशाच्या सार्वभैोमत्वाला, अंखडतेला आणि सुरक्षेला धोका असल्याने बंदी लागू केल्याचे सरकारने आदेशात म्हटले होते.