ETV Bharat / business

'टाळेबंदीत दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत २० टक्क्यांची वाढ' - milk products during lockdown

दिल्ली, मुंबई, कोलकाता, कानपूर आणि लखनौ या महानगरांमध्ये कामगार मिळणे ही सर्वात मोठी समस्या असल्याचे लोधी यांनी सांगितले. लोक घरातच थांबत असल्याने दुधाच्या खरेदीचे प्रमाण वाढले आहे.

मूलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आर. एस. सोधी

author img

By

Published : Apr 27, 2020, 11:24 AM IST

हैदराबाद - कोरोनाची महामारी ही भारतीय उद्योगासाठी कठोर परिक्षा ठरत आहे. या स्थिती अमूलने शेतकऱ्यांकडून खरेदी आणि ग्राहकांना विक्री करण्याचे प्रमाण वाढविले आहे. हे संतुलन कसे साधले याविषयी माहिती अमूलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आर. एस. सोधी यांनी ईटीव्ही भारतने घेतलेल्या मुलाखतीत दिली.

आर. एस. सोधी म्हणाले, की आमचा संपूर्ण व्यवसाय दुधावर अवलंबून आहे. रोज एकवेळ (पूर्वी दोन वेळ) ३६ लाख शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्यात येते. ही खरेदी नेहमीपेक्षा १५ टक्के अधिक आहे. लहान विक्रेते, लहान दूध डेअरी व्यवसायिक व मिठाई विक्रेते यांनी गुजरात व गुजरातबाहेर दूध खरेदी करणे थांबविले आहे. त्यामुळे शेतकरी अमूलमध्ये जास्तीत जास्त दूध विक्रीला देत आहेत.

अमूलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आर. एस. सोधी यांची मुलाखत

कामगारांच्या सुरक्षिततेसाठी अनेक मार्गदर्शक सूचनांचे पालन-

कंपनीने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक मार्गदर्शक सूचनांचे पालन १७ मार्चपासून म्हणजे टाळेबंदीच्या घोषणेपूर्वी आठ दिवसांपासून सुरुवात केली आहे. गुजरात आणि गुजरातबाहेरील सर्व १८,५०० दूध संकलक आणि शेतकऱ्यांना सुरक्षित उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे.

दिल्ली, मुंबई व कोलकात्यात कामगार मिळण्यात अडचणी-

दिल्ली, मुंबई, कोलकाता, कानपूर आणि लखनौ या महानगरांमध्ये कामगार मिळणे ही सर्वात मोठी समस्या असल्याचे लोधी यांनी सांगितले. लोक घरातच थांबत असल्याने दुधाच्या खरेदीचे प्रमाण वाढले आहे. सुरुवातीला लोकांना दूध खरेदी करण्याची चिंता वाटत होती. त्यावेळी दुधाच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ झाली होती. तर चौथ्या दिवशी दुधाच्या विक्रीत ३० टक्के घट झाली होती. कारण हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर दुकाने बंद असल्याने विक्री घटली होती. दुसरे कारण म्हणजे चिंतेने वाढलेली खरेदी थांबली आहे. सध्या, हॉटेल बंद असूनही दूध विक्री केवळ सात ते आठ टक्क्यांनी कमी झाली आहे. दही, तूप, लोणी, चीज हे घरगुती पदार्थ तयार करण्यासाठी २० टक्के दुधाच्या विक्रीत वाढ झाली आहे.

हेही वाचा-केंद्र सरकारच्या आदेशाला हरताळ; विमान कंपन्यांकडून तिकीट बुकिंग सुरू

ऑनलाईन विक्रीत ३० ते ४० टक्क्यांची वाढ-

आर. एस. सोधी म्हणाले, की सुरुवातीला ऑनलाईन विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्याला डिलिव्हरी करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे ऑनलाईन विक्रीत घट झाली होती. सध्या, ऑनलाईन विक्री ही ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे.

हेही वाचा-कोरोनाचा परिणाम : सेवा क्षेत्रातील कर्मचारी भविष्यातही करणार घरातून काम

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला आमचे प्राधान्य-

कामगार आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता ही केवळ आमच्यासाठी चिंतेची बाब असल्याचे अमूलचे चेअरमन यांनी सांगितले. दूध संकलन अथवा पुरवठा साखळीत काही अडचणी आहेत का, असा लोधी यांना प्रश्न विचारला. त्यावर लोधी यांनी कोणतीही समस्या येणार नसल्याचे सांगितले. एका बाजूला शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळत आहे. तर दुसरीकडे ग्राहकांना जास्त पैसे न देता चांगला भाव मिळत आहे, अशी स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.

अडचणीवर मात करण्यासाठी तंत्रज्ञान ठरले उपयुक्त-

कमीत कमी कर्मचारी हे कार्यालयात येत आहेत. तंत्रज्ञानामुळे काम करणे शक्य आहे. बिलेदेखील घरातून तयार केली जात आहेत. केवळ उत्पादन प्रकल्पामधील कामे करण्यात येत आहेत. आम्ही कोणालाही व कुठेही बोलू शकतो, त्यामुळे काम करणे सोपे जाते.

एफएमसीजी क्षेत्रासमोरील आव्हाने हे टाळेबंदीनंतर संपणार-

सर्व एफएमसीजी क्षेत्रासाठी विशेषत: अन्न कंपन्यांनी समजून घ्यायला हवे, की त्यांची पाईपलाईन (मागणी) रिकामी आहे. कारण ग्राहकांनी खूप मोठी खरेदी केली आहे. त्यामुळे ही पाईपलाईन पहिल्यांदा किती वेगाने भरता येईल, हे महत्त्वाचे आहे. दुसरे म्हणजे ग्राहक हे अधिकतर जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीकडे वळत आहेत. ते आरोग्याबाबत सजग असल्याने उत्पादन क्षेत्राने त्यांच्या अपेक्षापूर्ततेसाठी काय करता येईल हे शिकले पाहिजे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.