नवी दिल्ली - आगामी दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढवणार असल्याचे मंगळवारी रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले. या सणांसाठी २० ऑक्टोबरपासून ३० नोव्हेंबरच्या दरम्यान १९६ दुहेरी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.
आरक्षित तिकिटांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी देखील हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येत्या काही दिवसांत या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विभागीय रेल्वेमार्फत जोडण्यात येणार आहे. सोमवारी उत्तर रेल्वेने शताब्दी एक्स्प्रेस, दुरंतो आणि राजधानी एक्स्प्रेससह आणखी 40 गाड्यांची घोषणा केली आहे.
हेही वाचा - वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी एअरटेलचे आकाश एज्यु टीव्ही चॅनेल