ETV Bharat / briefs

पुणे : दुसरा डोळा वाचण्यासाठी तरुणांनी घेतला पुढाकार; सोशल मीडियाचा केला सदुपयोग

author img

By

Published : May 9, 2021, 3:51 PM IST

बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील संतोष मच्छिंद्र हरिहर यांना मागील महिन्यात कोरोनाची बाधा झाली. हरिहर यांना बारामती येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Santosh harihar
संतोष हरिहर

बारामती (पुणे) - येथील रुग्णालयात उपचार घेत असताना मधुमेह असल्याने औषध गोळ्यांची बाधा होऊन एका व्यक्तीचा एक डोळा निकामी झाला. तर दुसरा डोळा वाचविण्यासाठी लाखो रुपयांची खर्च करण्याची ऐपत नव्हती. अशावेळी बारामती तालुक्यातील डोर्लेवाडीच्या तरुणांनी व्हाट्सअप गृपच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. अवघ्या एका दिवसात लाखोंची मदत गोळा झाली आणि डोळ्यांची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.

बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील संतोष मच्छिंद्र हरिहर यांना मागील महिन्यात कोरोनाची बाधा झाली. हरिहर यांना बारामती येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोरोनावरील उपचार करीत असतानाच हरिहर यांना मधुमेह असल्याने औषध गोळ्यांचा दुष्परिणाम त्यांच्या डोळ्यावर झाले. वेळीच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न आल्याने त्यांना एक डोळा गमवावा लागला. मात्र, दुसरा डोळा वाचवण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे नेत्ररोग तज्ञांनी सांगितले.

सोशल मीडियाची झाली मदत -

हरीहर यांच्या उपचारासाठी ५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, हरीहर यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. टीव्ही दुरुस्त करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यातूनच ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारा खर्च परवडणारा नव्हता. त्यामुळे तरुणांनी एकत्र येत व्हाट्सअप गृपद्वारे काही रक्कम जमा केली. हरिहर यांच्या पत्नीने गळ्यातील मंगळसूत्र मोडून शस्त्रक्रियेसाठी पैसे जमा केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून डोर्लेवाडीकरांनीही गावातील एका तरुणाच्या उपचारासाठी दाखवलेली दातृत्वाची भावना तितकीच मोलाची असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.

तरुणांमुळे वाचला डोळा -

माझ्या पतीवर उपचार सुरू असताना मला गावातील ग्रामस्थांनी खूप धीर दिला. शिवाय आता उपचारासाठी देखील आर्थिक मदत करीत आहेत. त्यांच्या उपकाराची परतफेड करणे शक्य नसल्याची भावना हरिहर यांच्या पत्नी सविता हरिहर यांनी व्यक्त केली. सोमनाथ भिले, संतोष नेवसे, अजित वामन, दादा दळवी, अजित जाधव, संतोष काळेबेरे या तरुणांच्या पुढाकाराने हरिहर यांचा दुसरा डोळा वाचू शकला. नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.