गोंदिया - नवरात्रीच्या पर्वावर डव्वा गावात महिलांना दुर्गा देवीचा अवतार पहायला मिळाला आहे. गावात दारू बंदी असतानाही अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्याला पकडून जाब विचारायला गेलेल्या महिलांवर त्यात दारू विक्रेत्याने चाकू काढून भीती दाखवायचा प्रयत्न केला असता. महिलांनी दारू विक्रेत्याला चांगला चोप दिल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील डव्वा या गावात घडली आहे. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात दारू विक्रेत्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील डव्वा येथे अवैध दारूविक्रेत्यांमुळे व्यसनाधिनतेच्या प्रमाणात वाढ होत आहे. एवढेच नाहीतर महिला व मुलींच्या सुरक्षतेचे प्रश्नही निर्माण झाले. यामुळे दारूबंदी महिला समितीच्या वतीने डव्वा येथे दारूबंदीचे आवाहन करण्यात आले. त्या अनुषंगाने 6 ऑक्टोबरला गावात दवंडीच्या माध्यमातून अवैध दारू विक्रेत्यांसह दारू पिणाऱ्यांना दारूबंदी मोहिमेत सहभागी व्हावे, या आवाहनासह अवैध दारूविक्री बंद करण्यात यावी, अशी ताकीद देण्यात आली. असे असतानाही दोन व्यक्ती बसस्थानकाजवळ अवैधरित्या दारू विक्री करत असल्याची माहिती समितीच्या महिलांना मिळाली.
या माहितीच्या आधारावर दारूबंदी समितीच्या महिला व सहकारी पुरुषांनी अवैध दारूविक्रेत्यांना समज देण्याच्या अनुषंगाने घटनास्थळ गाठले. मात्र, दारूबंदीला सहकार्य करण्याऐवजी त्या दोन्ही दारू विक्रेत्यांनी फिर्यादी महिलेला काठीने मारून जखमी केले व चाकूचा धाक दाखवत होते. तर इतर महिलांना पाहूण घेण्याची धमकी दिली. यामुळे गावात चांगलेच वातावरण तापले. या दरम्यान महिलांनी त्या दारू विक्रेत्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका दारू विक्रेत्याने त्याच्याजवळील चाकूचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलांनी त्या दारू विक्रेत्याला घटनास्थळावरून हाकलून लावले.
या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असून प्रकरणात दोन्ही आरोपींवर पोलीस कोणती कारवाई करणार, याकडे डव्वा वासीयांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - गोंदिया : उमरपायली-आंबेझरी जंगलात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेले स्फोटकं जप्त