ETV Bharat / briefs

दुष्काळग्रस्त मराठवाड्याला ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा; इस्त्रायलचे सहकार्य - इस्त्रायलमध्ये जलक्रांती न्यूज

दुष्काळग्रस्त मराठवाड्याला ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा करून येथील पाण्याचे संकट दूर करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून इस्राईलच्या एका कंपनीची मदत घेतली जाणार आहे त्यासाठी आज मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.

दुष्काळग्रस्त मराठवाड्याला ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा

author img

By

Published : Aug 11, 2020, 10:51 PM IST

मुंबई - दुष्काळग्रस्त मराठवाड्याला ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा करून येथील पाण्याचे संकट दूर करण्यासंदर्भात राज्य सरकार कडून इस्राईलच्या एका कंपनीची मदत घेतली जाणार आहे त्यासाठी आज मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.

मराठवाड्यातील काही भागांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा करून तेथील पिण्याचे पाणी आणि कृषी संदर्भातील पाण्याचा वापर कसा करता येईल यासंदर्भात ही बैठक झाली. मेकोरेट कन्सल्टंट, काऊंसिल जनरल ऑफ इस्त्रायल यांच्या समवेत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन त्या संदर्भातील आढावा घेतला. इस्त्रायलमध्ये झालेल्या जलक्रांतीच्या धर्तीवर मराठवाड्यात त्यापद्धतची यंत्रणा राबवता येईल का याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी मेकोरेट कन्सल्टंट, काऊंसिल जनरल ऑफ इस्त्रायल यांनी सहकार्य करण्यास सहमती दर्शवली तसेच एक संयुक्त अभ्यास गट स्थापन करण्याबाबतही निर्णय झाला.
जलसंपदा विभागाचे सचिव घाणेकर, मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे संचालक डॉ. एन. व्ही. शिंदे व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच इस्त्राईलचे प्रतिनिधी म्हणून याकोव, निलरोड कलमार,अनय जोगलेकर, डिगो बर्जर,जलसंपदा विभागाचे कपोले, बेलसरे उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.