कोलकाता - कोलकाता संघाचा स्टार खेळाडू आंद्रे रसेलने यंदाच्या आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रसेलमध्ये कोणत्याही क्षणी सामन्याची बाजू पलटवण्याची क्षमता आहे. फलंदाजी करताना तो जेवढा आक्रमक असतो तेवढाच बाद झाल्यावरही होतो. हे दिसून आले. आज चेन्नईविरुद्धच्या सामन्यात स्वस्तात बाद झाल्यावर डगआउटमध्ये परतताना त्याने झाडांवर आपला राग व्यक्त केला.
-
#KKR's Andre Russel smashed some bushes walking back to the pavillion. And Imran Tahir is in a hurry, don't miss his expressions. #KKRvCSK #IPL2019 pic.twitter.com/004I5rLjxc
— Deepak Raj Verma (@DeVeDeTr) April 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#KKR's Andre Russel smashed some bushes walking back to the pavillion. And Imran Tahir is in a hurry, don't miss his expressions. #KKRvCSK #IPL2019 pic.twitter.com/004I5rLjxc
— Deepak Raj Verma (@DeVeDeTr) April 14, 2019#KKR's Andre Russel smashed some bushes walking back to the pavillion. And Imran Tahir is in a hurry, don't miss his expressions. #KKRvCSK #IPL2019 pic.twitter.com/004I5rLjxc
— Deepak Raj Verma (@DeVeDeTr) April 14, 2019
रसेलने सीमारेषेजवळ असलेल्या झाडांवर जोरजोराने बॅट आदळत राग व्यक्त केला. यावेळचा त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. रविवारच्या सामन्यात तो ४ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार मारून १० धावांवर बाद झाला. मोठा फटका मारण्याच्या नादात तो ताहिरच्या चेंडूवर ध्रुव शौरी याच्याकडून झेलबाद झाला.
यंदा आयपीएलच्या ८ सामन्यात त्याने ३१२ धावा काढून सोबत ६ गडी बाद केले आहेत. त्यात २ अर्धशतकांचा समावेश आहे.