ETV Bharat / briefs

कोल्हापुरात आणखी 12 कोरोना पॉझिटिव्ह, आकडा सातशेपार; 7 जणांना डिस्चार्ज

12 रुग्णांपैकी सर्वाधिक 5 रुग्ण एकट्या करवीर तालुक्यातील आहेत. पन्हाळा तालुका आणि कोल्हापूर शहरातील प्रत्येकी 2 तसेच, हातकणंगले, शाहूवाडी आणि गडहिंग्लजमधील प्रत्येकी 1, असे एकूण 12 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सध्या एकूण अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 99 झाली आहे.

कोल्हापूर कोरोना न्यूज
कोल्हापूर कोरोना न्यूज
author img

By

Published : Jun 12, 2020, 2:02 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत होती. मात्र, यात आणखी 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 708 वर पोहोचली आहे. शिवाय मागील 12 तासांमध्ये आणखी 7 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर आजपर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या एकूण अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 99 झाली आहे.

12 रुग्णांपैकी सर्वाधिक 5 रुग्ण एकट्या करवीर तालुक्यातील आहेत, तर पन्हाळा तालुका आणि कोल्हापूर शहरातील प्रत्येकी 2 तसेच, हातकणंगले, शाहूवाडी आणि गडहिंग्लजमधील प्रत्येकी 1, असे एकूण 12 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

आतापर्यंत तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांच्या संख्येवर एक नजर :

आजरा- 74, भुदरगड- 70, चंदगड- 74, गडहिंग्लज- 81, गगनबावडा- 6, हातकणंगले- 9, कागल- 57, करवीर- 19, पन्हाळा- 27, राधानगरी- 63, शाहुवाडी- 176, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-26, असे एकूण 700 आणि पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-1, कर्नाटक-2 आणि आंध्र प्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 708 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

जिल्ह्यातील एकूण 708 रुग्णांपैकी 601 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे, तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल असलेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 99 इतकी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.