ETV Bharat / briefs

परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा 'जनता कर्फ्यू'; पाच दिवस कडकडीत बंद

परभणी जिल्ह्यात 26 ते 30 सप्टेंबर असे 5 दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचे आदेश जारी केले आहे. याद्वारे कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Sep 24, 2020, 8:53 PM IST

परभणी - 'कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यापूर्वी संचारबंदीमुळे कोरोनाच्या प्रसाराला प्रतिबंध लावणे शक्य झाले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी स्वतः या संदर्भातील आदेश बजावून सर्व व्यवसाय आणि सेवांना 26 ते 30 सप्टेंबर असे 5 दिवस बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. अर्थात या जनता कर्फ्यू मधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

'लॉकडाउन'चा सुरुवातीचा दीड महिना एकही कोरोनाचा रुग्ण नसणाऱ्या परभणी जिल्ह्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून 'कोरोना' चा संसर्ग प्रचंड झपाट्याने वाढत गेला. त्यानुसार सध्या परभणी जिल्ह्यातील कोरुना बाधितांची संख्या 5 हजाराच्या जवळपास पोहचली आहे, तर 200 हून अधिक कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. कोरनाचा प्रसार पाहता त्याला रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करण्याची आवश्यकता असल्याची भावना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी व्यक्त केली आहे.

संसर्ग वाढत असतानाच नागरिक मात्र गरज नसताना घराबाहेर, बाजारपेठेत आणि इतरत्र फिरताना दिसत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढला असून याला आता प्रतिबंध करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे 'जनता कर्फ्यू' ही संकल्पना शंभर टक्के अंमलात आणून ती यशस्वी करणे आवश्यक असल्याचेही मुगळीकर म्हणाले.

जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेला आवाहन केले आहे की, 'या जनता कर्फ्यूमध्ये जिल्ह्यातील सर्व दुकानदार, छोटे-मोठे बाजार, ग्रामीण कारागीर, छोटे व्यवसायिक, उद्योजक, शेतमाल विक्रीत सहभागी असणारे सर्व घटक, लघु व कुटीर उद्योजक त्याचप्रमाणे प्रवासी व मालवाहतूक करणारे चालक, मालक व वाहक या शिवाय शासकीय-निमशासकीय सेवा या सर्वांनी कोरोना विषाणूचा परभणी जिल्ह्यात वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी 26 ते 30 सप्टेंबरपर्यंतच्या या जनता कर्फ्यूमध्ये शंभर टक्के योगदान द्यावे'.

या कालावधीत अत्यावश्यक सेवा मात्र सुरूच राहतील. त्यामुळे गंभीर आजारी किंवा नागरिकांनी भीती बाळगू नये, असेही स्पष्ट केले. दरम्यान, शनिवारी (26 सप्टेंबर) पासून या जनता कर्फ्यूला सुरुवात होणार असून सर्वांनी घरात राहून या विषाणूच्या संक्रमणाला रोखायचे आहे, असेही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.