वॉशिंग्टन - वॉशिंग्टनच्या रस्त्यावर शनिवारी हजारो अमेरिकन नागरिकांनी जॉर्ज फ्लॉईड मृत्यू प्रकरणी पोलिसांची निषेध केला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत जॉर्ज फ्लॉईड याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, याचाच निषेध करण्यासाठी नागरिक वॉशिंग्टनच्या रस्त्यावर उतरले होते.
![america newThousands protest for Floyd near the White Houses](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/07:35_7510339_1023_7510339_1591494675357.png)
यावेळी जॉर्ज फ्लॉईड राहत असलेल्या उत्तर कॅरोलीना येथील चर्चमध्ये शेकडो लोक श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. या नियोजित निषेध मोर्चाच्या अगोदर वॉशिंग्टनच्या बऱ्याचशा भागातील वाहतूक पोलिसांनी पूर्णपणे बंद केली होती. अमेरिकेतील प्रमुख शहरांसह या घटनेच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.