विशाखापट्टणम - आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर आणि फाफ डु प्लेसिस आणि शेन वॉटसन यांच्या अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने दिल्लीवर मात केली. या विजयासह चेन्नईने दिल्लीचे अंतिम फेरीत पोहचण्याचे स्वप्न धुळीस मिळविले. या सामन्यात काही रोमांचक क्षण पाहायला मिळाले. या घटनेने सर्वांची मने जिंकली.
ऋषभ पंत जेव्हा फलंदाजी करण्यास आला तेव्हा त्याच्या बुटाची लेस निघाली. तेव्हा पंतला बूटाची लेस बांधताना अडचणी येत होत्या. त्यावेळी सुरेश रैना पुढे येऊन पंतची मदत करत होता. रैनाने त्याच्या बुटाची लेस बांधून दिली. हा व्हिडिओ आयपीएलने ऑफिशियल ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. याघटनेनंतर रैनाच्या खेळ भावनेचे कौतुक होत आहे.
तीन वेळा आयपीएलचा किताब जिंकणाऱ्या चेन्नई संघाने यंदा पुन्हा अंतिम सामन्यात धडक मारली. चेन्नई यापूर्वी २००८, २०१०, २०११,२०१२,२०१३, २०१५ आणि २०१८ साली अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यापैकी २०१०, २०११ आणि २०१८ साली किताब पटकावला होता.