मुंबई - सध्या सर्वत्र लोकसभा निवडणूकीची धामधुम सुरू आहे. त्यामुळे सर्व पक्षांचा प्रचारही जोरदार सुरू आहे. यावेळी तर बॉलिवूडच्या अभिनेत्रींनीही राजकारणात उडी घेतली आहे. यात उर्मिला मातोंडकर यांचे नाव सध्या फार चर्चेत आहे. मात्र, अभिनेत्रींसाठी राजकारणातील एन्ट्री ही कसरतीप्रमाणे असते. अनेक मान-अपमान त्यांच्या वाट्याला येत असतो. राजकारणात अभिनेत्रींनाच का ट्रोल केलं जातं, असा प्रश्न अभिनेत्री स्पृहा जोशीने आपल्या फेसबुक पोस्टवरुन विचारला आहे.
निवडणुकांच्या रिंगणात उतरलेल्या अभिनेत्रींचे ज्याप्रकारे चित्रण केले जाते, त्यावरून स्पृहाने आपल्या पोस्टमधून नाराजी व्यक्त केली आहे. 'एखादी अभिनेत्री मनोरंजन क्षेत्रातून राजकारणात येत असेल, तर तिच्या वाट्याला हे शेमिंग का येतं. अभिनय करून मग राजकारणात उतरणाऱ्या अभिनेत्यांना / हिरोंना का नाही या सगळ्याला तोंड द्यावं लागत ? स्त्री कलाकारांच्या बाबतीत अशी सोयीस्कर घाणेरडी वृत्ती कशी उभारून येते आपल्याकडे ? याची पाळंमुळं फार खोल रुजली आहेत', असेही तिने या पोस्टमध्ये व्यक्त केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">