पालघर/वसई - वसई पूर्वेतील तिल्हेर आमराई भागात इनोव्हाचा अपघात झाला. यात इनोव्हाचा चालक गंभीर जखमी झाला आहे. भिवंडीच्या दिशेने भरधाव जाणारी इनोव्हा गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या झाडाला जोरदार धडकल्याने हा अपघात झाला.
जखमी चालकाला प्रथम नरेंद्राचार्य संस्थानच्या महामार्ग रुग्णवाहिकेतून नजीकच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते . मात्र त्याची प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी नालासोपारा येथे हलवण्यात आले आहे.
एम एच ४८ एस १२४२ या क्रमांकाची इनोव्हा चालक राज कुमार भुषण यादव (वय वर्षे २६ . मु . भिवंडी . जि ठाणे) हा मुळ ईलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथील आहे. तो शिरसाडकडून भिवंडीला जात होता. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. शेजारील गावाच्या नागरिकांच्या मदतीने जखमी चालकाला रुग्णवाहिकेतून दवाखान्यात हलवण्यात आले. या अपघातात गाडीच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. छोट्या रस्त्यावर भरधाव गाडी हाकल्याने नियंत्रण सुटून हा अपघात घडला असावा, असे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले.