कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. येथे आगमन होताच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. लोकसभेच्या पार्श्वभूमिवर त्यांची ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. खासदार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यात अनेक दिवसांपासून वाद आहे. शरद पवार हा वाद मिटविण्यासाठी आज मध्यस्थी करणार असल्याचे बोलले जात आहे.
शरद पवार दिवसभरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटी घेतील. तसेच, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करतील. त्यामुळे शरद पवारांची ही भेट लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची भेट आहे.
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात अनेक दिवसांपासून वाद होता. शरद पवारांनी या दोघांचे मनोमिलन घडवून आणले. त्यामुळे कोल्हापुरातही महाडिक आणि सतेज पाटलांचे मनोमिलन होणार का, याकडे आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.