ठाणे - तांदूळ घेऊन निघालेला कंटेनर घोडबंदर येथे अँटी क्रॅश बॅरिगेट्स तोडून खाली कोसळला. अपघातात चालक जखमी झाला आहे. हायवे पेट्रोलिंग पथकाने त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.
भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरला (एम एच 43 बीपी 1854) घोडबंदरजवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे. घोडबंदर येथील टोल नाक्याजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला आहे.
रस्त्याच्या बाजूला लावलेले अॅन्टी क्रॅश बॅरीगेट्स तोडून कंटेनर खाली कोसळला. या घटनेची माहिती मिळताच काशिमिरा पोलीस आणि आयआरबी हायवे पेट्रोलिंग पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने अपघातात जखमी झालेल्या चालकाला बाहेर काढून जवळच्या रूग्णालयामध्ये दाखल केले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.