ETV Bharat / briefs

रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत

दिवसभर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. तर उन्हामुळे रत्नागिरीकर हैराण झाले होते. सायंकाळी मात्र पावसानं हजेरी लावली. चिपळूण, संगमेश्वर, देवरुख तसेच जिल्ह्यातील आणखी काही ठिकाणी हा पाऊस झाला.

Ratnagiri rain news
रत्नागिरी पाऊस
author img

By

Published : May 7, 2021, 8:27 AM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात काल (गुरुवारी) अवकाळी पावसाने हजेरी लावली. चिपळूणसह देवरुख आणि संगमेश्वर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला.

दिवसभर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. तर उन्हामुळे रत्नागिरीकर हैराण झाले होते. सायंकाळी मात्र पावसानं हजेरी लावली. चिपळूण, संगमेश्वर, देवरुख तसेच जिल्ह्यातील आणखी काही ठिकाणी हा पाऊस झाला. या पावसामुळे हवेत काही प्रमाणात गारवा निर्माण झाला.

आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत -

एकीकडे ऐन आंबा हंगाम मध्यावर असताना, या अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. कारण वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. तयार झालेला आंबा वाऱ्यामुळे पडला आहे. त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.