मुंबई - रात्रीकालीन ब्लॉक कालावधीत किंवा गाड्या धावत नसताना केल्या जाणाऱ्या देखभाल दुरुस्तीपेक्षा कितीतरी जास्त कामे रविवारच्या मेगा ब्लॉकमध्ये केली जातात. यात काल (12 जुलै) भर पावसात विद्याविहार-ठाणे अप व डाऊन जलद मार्गावरील ब्लॉक दरम्यान मध्य रेल्वेच्या कोरोना वॉरियर्सनी देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण केली.
भांडुप ते मुलुंड दरम्यान 1.54 किमी. रुळांचे नूतनीकरण, रोड रेल वाहनांद्वारे सुमारे 100 स्लिपर रिप्लेसमेंट आणि 55 स्क्रॅप रेल काढून टाकण्यात आले, तसेच पॉइंट्स आणि क्रॉस ओव्हर पॉईंट्स रिप्लेसमेंट व 6 ठिकाणी एल्युमिनो-थर्मिक वेल्डिंग पूर्ण करण्यात आले.
दोन टॉवर वॅगन्स आणि एका शिडी गॅगसह हे कार्य करण्यात आले. 250 मीटर लांबीचे कॉन्टॅक्ट वायर रिप्लेसमेंट करण्यात आले व 3 स्प्लाइस आणि 4 कमकुवत पॉईंट काढण्यात आले. अंदाजे एक किमी ओएचई वार्षिक ओव्हरहॉलिंग, टर्न आऊट, 40 बाँडची तरतूद आणि 39 प्लेट्सची तरतूद करण्यात आली.
तसेच, ऑडिओ फ्रीक्वेंसी ट्रॅक सर्किटचे ट्यूनिंग करण्यात आले. घाटकोपर येथे 10 एस-बॉन्ड, 10 ट्रॅक सर्किटच्या ट्रॅक लीड वायर्स, 50 चॅनेल पिन बदलण्यात आले, तसेच लोकेशन बॉक्सची (एलओसी) देखभाल करण्यात आली. 5 ठिकाणी गंधकांनी साफसफाई, ट्रॅक 221टी च्या ग्ल्यूड जॉइंट बदलण्यात आल्या, पॉवर रूम उपकरणांची ब्लोअरने साफसफाई, विक्रोळी येथे के-बोर्ड डिस्क्रीप्शन चाचणी, अद्ययावत करण्यात आली. मालमत्ता चांगल्या स्थितीत राहण्यासाठी सर्व कामे केली गेली.
सर्वसाधारणपणे आणि विशेषत: पावसाळ्यात ट्रेनच्या कार्यक्षम संचालनामध्ये डिजिटल एक्सेल काउंटर सेन्सर महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ट्रॅक साईडला इलेक्ट्रॉनिक असेंब्ली असलेले फील्ड युनिट जाणाऱ्या(पासिंग) चाकांची नोंद घेतात आणि ट्रॅकची व्याप्ती (ऑक्युपेशन) निश्चित करण्यासाठी ती माहिती केंद्रीय मूल्यांकन कर्त्याकडे पाठवतात.
तसेच, वाशिंद येथील 100 वर्षाहून अधिक जुना पादचारी पूल देखील निर्धारित वेळेत रोड क्रेनचा वापर करून पाडण्यात आला. यात प्रत्येकी 18.9 मीटर आणि 2.59 मीटर रुंदीचे दोन स्पॅन होते. या पुलाच्या ऐवजी एक नवीन पादचारी पूल आधीपासून वापरात आला आहे.