ETV Bharat / briefs

पुण्यातील 'या' उमेदवाराचा हटके प्रचार, सायकलवर फिरुन करतात 'पर्यावरणाचे संवर्धना'चा प्रसार

पुण्यातून 'किटली' या चिन्हावर ते लोकसभेला अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत.

author img

By

Published : Apr 18, 2019, 12:29 PM IST

आनंद वांजपे

पुणे - लोकसभा मतदार संघाची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. आघाडी आणि युतीच्या उमेदवारांकडुन जोरदार प्रचार सुरू आहे. कार्यकर्ते, गाड्यांचा लवाजमा यासह प्रमुख पक्षाचे उमेदवार मतदारांना सामोरे जाताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पुण्यातील अपक्ष उमेदवार आनंद वांजपे यांनी एका वेगळ्याचरितीने प्रचार सुरू केला आहे. सायकलवर ते शहरात फिरून एकटेच स्वतःचा प्रचार करत आहेत.

आनंद वांजपे यांचा सायकलवरुन प्रचार

आनंद वांजपे यांनी सांगितल्यानुसार, त्यांनी आॅस्ट्रेलियातील मेलबर्न शहरातून ऍडव्हान्स डिप्लोमा अँड प्रिंटिंग टेक्नॉलॉजी या विषयात पदवी प्राप्त केली आहे. पुण्यातून 'किटली' या चिन्हावर ते लोकसभेला अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. 'प्रदुषण मुक्त पुणे आणि आरोग्य संपन्न पुणे' अशी पाटी लावुन सगळीकडे निवडणुकीचा आणि प्रदुषण मुक्तीचा प्रसार ते करत आहेत.

प्रदूषण आणि वाहतूक हे दोन प्रश्न घेऊन वांजपे निवडणुकीला सामोरे जात आहेत. वांजपे म्हणतात, आतापर्यत अनेक उमेदवार निवडून आले पण त्यांनी शहराच्या या दोन मुख्य प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. त्यामुळे मागील आठ वर्षांपासून सायकलवर फिरत याविषयावर नागरिकांमध्ये जनजागृती करत आहे. खासदार होऊन तरी हे प्रश्न सोडवता येतील, त्यामुळे निवडणुकीला उभा आहे.

आनंद वांजपे म्हणतात, प्रदूषणाचा झालेला कडेलोट पाहून मला राहवले नाही. यावर मला काय करता येईल असा विचार करून आठ वर्षापूर्वी मी सायकल चालवायला सुरुवात केली. वाढत्या प्रदूषणाचा विचार लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीचा मार्ग निवडला. माझा प्रचार वाया जाऊ नये यासाठी 'पर्यावरणाचे संवर्धन करा' हा विचार घेऊन लोकांपर्यंत जात आहे. अनेक नागरिक माझा या विचाराकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असून मला पाठिंबा देत असल्याचे वांजपे यांनी सांगितले.

Intro:पुणे लोकसभा मतदार संघाची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय..त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. आघाडी आणि युतीच्या उमेदवारांकडुन जोरदार प्रचार सुरू आहे. कार्यकर्ते, गाड्यांचा लवाजमा यासह प्रमुख पक्षाचे उमेदवार मतदारांना सामोरे जाताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पुण्यातील अपक्ष उमेदवार आनंद वांजपे यांनी एका वेगळ्याच रीतीने प्रचार सुरू केलाय. सायकलवर ते शहरात फिरून एकटेच स्वतःचा प्रचार करत आहेत.Body:आनंद वांजपे यांनी सांगितल्यानुसार त्यांनी आस्ट्रेलियातील मेलबर्न शहरातून ऍडव्हान्स डिप्लोमा अँड प्रिंटिंग टेक्नॉलॉजी या विषयात पदवी प्राप्त केली आहे. पुण्यातून 'किटली' या चिन्हावर ते लोकसभेला अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. "प्रदुषण मुक्त पुणे आणि आरोग्य संपन्न पुणे अशी पाटी" लावुन सगळीकडे निवडणुकीचा आणि प्रदुषण मुक्तीचा प्रसार ते करतातConclusion:प्रदूषण आणि वाहतूक हे दोन प्रश्न घेऊन वांजपे निवडणुकीला सामोरे जात आहेत. वांजपे म्हणतात, आतापर्यत अनेक उमेदवार निवडून आले. पण त्यांनी शहराच्या या दोन मुख्य प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. त्यामुळे मागील आठ वर्षांपासून सायकलवर फिरत याविषयावर नागरिकांमध्ये जनजागृती करत आहे. खासदार होऊन तरी हे प्रश्न सोडवता येतील, त्यामुळे निवडणुकीला उभा आहे.

आनंद वांजपे म्हणतात, प्रदूषणाचा झालेला कडेलोट पाहून मला राहवले नाही. यावर मला काय करता येईल असा विचार करून आठ वर्षापूर्वी मी सायकल चालवायला सुरवात केली. वाढत्या प्रदूषणाचा विचार लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीचा मार्ग निवडला. माझा प्रचार वाया जाऊ नये यासाठी 'पर्यावरणाचे संवर्धन करा' हा विचार घेऊन लोकांपर्यंत जात आहे. अनेक नागरिक माझा या विचाराकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असून मला पाठिंबा देत असल्याचे वांजपे यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.