ETV Bharat / briefs

धक्कादायक! उपचारासाठी दाखल करून घेण्यास रुग्णालयांचा नकार.. नोएडात गरोदर महिलेचा मृत्यू - नोएडा रुग्णालय न्यूज

या गरोदर महिलेला शुक्रवारी सकाळी श्वास घेण्यास त्रास होत होता. ‘सकाळपासून तिला वेगवेगळ्या रुग्णालयांत घेऊन गेलो. मात्र, कोविड -19 सारखी लक्षणे वाटत असल्याचे सांगून त्यांनी तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. या महिलेचा सायंकाळी रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला,’ असे नातेवाईक म्हणाले.

नोएडात गर्भवती महिलेचा उपचारांअभावी मृत्यू

author img

By

Published : Jun 7, 2020, 10:18 AM IST

नोएडा (दिल्ली) - गाझियाबादच्या खोडा गावातील गर्भवती महिलेला नोएडामध्ये वैद्यकीय उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने शनिवारी दिले. महिलेला रुग्णवाहिकेतून नोएडा येथे आणण्यात आल्याचे सांगितले. मात्र, येथील सरकारी किंवा खासगी कोणत्याही रुग्णालयाने तिला दाखल करून घेतले नाही. त्यामुळे उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला, असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

या गरोदर महिलेला शुक्रवारी सकाळी श्वास घेण्यास त्रास होत होता. ‘आम्ही तिला सकाळी सहाच्या सुमारास नोएडाच्या रुग्णालयात घेऊन गेलो. तेथे तिला दाखल करून घेतले नाही. आम्हाला गाझियाबादला जाण्यास सांगण्यात आले,’ असे महिलेच्या नातेवाईकाने सांगितले. ‘सकाळपासून तिला वेगवेगळ्या रुग्णालयांत घेऊन गेलो. मात्र, कोविड -19 सारखी लक्षणे वाटत असल्याचे सांगून त्यांनी तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. या महिलेचा सायंकाळी रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला,’ असे नातेवाईक म्हणाले.

शनिवारी ही घटना जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणली असता, जिल्हा दंडाधिकारी सुहास एल. वाय. आणि अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (एडीएम) मुनिंद्र नाथ उपाध्याय यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. ‘आम्ही या प्रकरणाचा तपास करीत आहोत. घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी आम्ही दक्ष आहोत,’ असे गौतम बुद्ध नगरचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.