ETV Bharat / briefs

अनगरच्या खंडोबावाडीत पोलिसांचा लाठीचार्ज; लाठीचार्ज पूर्वनियोजित असल्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप - congress

या लाठीचार्जमध्ये १ लहान मुलगा, २ महिला आणि 3 पुरुष जखमी झाले

अनगरच्या खंडोबावाडीत पोलिसांचा लाठीचार्ज
author img

By

Published : Apr 19, 2019, 10:27 AM IST

सोलापूर - जिल्ह्यातील अनगर येथे मतदाना प्रक्रियेदरम्यान गोंधळ झाला. अनगर नजीकच्या खंडोबाचीवाडी येथे काही युवक हे आयोगाने निश्चित केलेल्या शंभर मीटरमध्ये उभे असल्याचे पोलिसांना आढळले. याबाबत पोलिसांनी सूचना देऊनही युवक जुमानत नसल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला.

अनगरच्या खंडोबावाडीत पोलिसांचा लाठीचार्ज

या लाठीचार्जमध्ये १ लहान मुलगा, २ महिला आणि 3 पुरुष जखमी झाले आहेत. त्याच्यावर उपचार सुरु असून सदर घटनास्थळी राष्ट्रवादीचे युवक नेते विक्रांत राजन पाटील हे उपस्थित होते. त्यावरून पोलिसांनी पाटील यांना ताब्यात घेऊन सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोहोळ पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. त्यांनतर पाचच्या सुमारास त्यांना मतदान करण्यासाठी सोडण्यात आले.

हा प्रकार घडल्यानंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि सोलापूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना माजी आमदार राजन पाटील यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी यापूर्वीच आम्हाला धमकी दिली होती. त्यामुळे हा लाठीचार्ज पूर्वनियोजित होता असा आरोप केला. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपने सत्तेचा वापर केल्याचा आरोप केला. याप्रकरणी मोहोळ पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

गेल्या पन्नास वर्षांपासून मोहोळ तालुक्यातल्या १२ वाड्या आणि १३ वे अनगर या भागात विक्रमी मतदानाची परंपरा आहे. प्रत्येक निवडणुकीत याभागात ८० टक्क्यांच्यापुढे मतदान होत आले आहे. त्यामुळे अनगरकर पाटील यांच्यावर आतापर्यंत अनेक आरोप झाले. पण मतदानाचा टक्का कमी झाला नाही. त्यामुळे झालेल्या लाठीचार्जनंतरही या भागात ८० टक्के मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Intro:सोलापूर : एकमुखी मतदानाची परंपरा असलेल्या अनगर येथे आज मतदानाप्रक्रियेदरम्यान गोंधळ झालाय.अनगर नजीकच्या खंडोबाचीवाडी येथे कांही युवक हे आयोगानं निश्चित केलेल्या शंभर मीटरमध्ये उभे असल्याचे पोलिसांना आढळले.याबाबत पोलिसांनी सूचना देऊनही युवक जुमानत नसल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला.
या लाठीचार्जमध्ये एक लहान मुलगा,दोन महिला आणि 3 पुरुष जखमी झाले आहेत.त्याच्यावर उपचार सुरु असून सदर घटनास्थळी राष्ट्रवादीचे युवक नेते विक्रांत राजन पाटील हे उपस्थित होते.त्यावरून पोलिसांनी पाटील यांना ताब्यात घेऊन सायंकाळी 5 वाजेपर्यंत मोहोळ पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. 5 नंतर त्यांना मतदान करण्यासाठी सोडण्यात आले.Body:हा प्रकार घडल्यानंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि सोलापूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडलं.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना माजी आमदार राजन पाटील यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी यापूर्वीच आम्हाला धमकी दिली होती.त्यामुळं हा लाठीचार्ज हा पूर्वनियोजित होता असा आरोप केला. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपनं सत्तेचा वापर केल्याचा आरोप केला.याप्रकरणी मोहोळ पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सूरु होते.
Conclusion:गेल्या पन्नास वर्षांपासून मोहोळ तालुक्यातल्या 12 वाड्या आणि 13 वे अनगर या भागांत विक्रमी मतदानाची परंपरा आहे.प्रत्येक निवडणुकीत 80 टक्क्यांच्या पुढं मतदान होत आलेलं आहे.त्यामुळं अनगरकर पाटील यांच्यावर आतापर्यंत अनेक आरोप झाले.पण मतदानाचा टक्का कमी झाला नाही.आज झालेल्या लाठीचार्जनंतरही या भागात 80 टक्के मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.