ETV Bharat / briefs

नाशिक जिल्ह्यातील पेन्शनधारक करणार मोदींच्या सभेत गांधीगिरी आंदोलन - गांधीगिरी

नाशिकमधील पिंपळगाव येथे होणाऱ्या नरेंद्र मोदींच्या सभेत गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणार असल्याचे हरिचंद्र गुजराती यांनी सांगितले.

पेन्शनधारक करणार मोदींच्या सभेत गांधीगिरी आंदोलन
author img

By

Published : Apr 17, 2019, 1:16 PM IST

नाशिक - 'नो कोशाहरी नो वोट'चा नारा देत नाशिक जिल्ह्यातील पेन्शनधारक मोदींच्या सभेत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करणार आहेत. पेन्शनधारकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का होत आहे? असा थेट प्रश्न पंतप्रधान मोदींना यावेळी विचारणार असल्याचे पेन्शन संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष हरिचंद्र गुजराती यांनी सांगितले. आमच्या मागण्या सरकार दरबारी समजून न घेतल्याने आता थेट पंतप्रधानांना न्याय मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील पेन्शनधारक करणार मोदींच्या सभेत गांधीगिरी आंदोलन

गेल्या अनेक वर्षांपासून पेन्शनधारक सरकारकडे आपल्या मागण्या मान्य करा म्हणून विनंती करत आहेत. मात्र, अजून सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास सव्वा लाखाच्यावरती विविध क्षेत्रातील पेन्शनधारक आहेत. काहींची तर अतिशय बिकट अवस्था झाली आहे. वयोवृद्ध झाल्याने कुठेही काम करता येत नाही. अवघ्‍या पंधराशे ते दोन हजार इतक्या मोजक्या पेन्शनवर घर कसे चालवायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

मंत्री, अधिकारी आश्वासन देऊन मोकळे होतात. देशातील सर्वच पेन्शनधारकांनी अनेकवेळा आंदोलने केली. मात्र, त्यांच्या हातात काहीच पडले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा या सरकार बापाने आमच्याकडे लक्ष द्यावे म्हणून आठवण करून देण्यासाठी नाशिकमधील पिंपळगाव येथे होणाऱ्या नरेंद्र मोदींच्या सभेत गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणार असल्याचे हरिचंद्र गुजराती यांनी सांगितले.

भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी 2014 च्या निवडणुकीत 95 पेन्शनधारकांना भगतसिंग कोशाहरी अहवालानुसार दरमहा 3 हजार आणि अधिक महागाई भत्ता देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच सत्तेत येताच तीन महिन्यात पेन्शनमध्ये वाढ करण्याचेही आश्वासन दिले होते. मात्र, या दोन्ही आश्वासनांचा भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विसर पडला आहे. जर या सरकारने लक्षच दिले नाही तर येत्या लोकसभा निवडणुकीत 'नो कोशाहारी नो वोट' असा नारा देत सत्ताधारी पक्षाला देशातील एकही पेन्शनधारक मतदान करणार नसल्याचा निर्णय सर्वच पेन्शनधारकांकडून घेण्यात आला आहे.

मात्र, मोदींच्या सभेत हे आंदोलन पोलीस यंत्रणा कितपत यशस्वी होऊ देते, की आंदोलन गुंडाळले जाते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Intro:नो कोशाहरी नो वोटचा नारा देत नाशिक जिल्ह्यातील पेन्शनर्स करणार मोदींच्या सभेत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन पेन्शनधारकांचा मागण्यांकडे दुर्लक्ष का होतंय असा थेट सवाल विचारणार पंतप्रधान मोदींना गेल्या अनेक दिवसापासून पेन्शनर्स आपले प्रश्न सरकारी दरबारी मांडतोय मात्र त्यांच्या अडचणी सरकारने न समजून घेतल्या न सोडवल्या म्हणून आता पंतप्रधानानकडेच न्याय मागण्याचं त्यांनी ठरवलं

Body:गेल्या अनेक वर्षापासून पेंशन धारक सरकारकडे आपल्या मागण्या मान्य करा म्हणून विनंती करताय मात्र अजून सरकार साफ दुर्लक्ष करत आहे नाशिक जिल्ह्यात जवळ सव्वा लाखाच्या वरती विविध क्षेत्रातील पेन्शन धारक आहेत काहींची तर अतिशय बिकट अवस्था झालीये वयोवृद्ध झाल्याने कुठेही काम करता येत नाही अवघ्‍या पंधराशे ते दोन हजार इतक्या मोजक्या पेन्शन वर घर कसं चालवायचं हा मोठा प्रश्न आहे मात्र मंत्री अधिकारी अश्वासन देऊन मोकळे होतात देशातील सर्वच पेन्शनधारकांना किती वेळा आंदोलन केले दिल्लीदरबारी प्रश्न मांडले मात्र हातात काहीच पडले नाही त्यामुळे पुन्हा एकदा या सरकार बापाने आमच्या कडे लक्ष द्यावं म्हणून आठवण करून देण्यासाठी नाशिक मधील पिंपळगाव येथे होणाऱ्या नरेंद्र मोदींच्या सभेत गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणार आहोत असे हरिचंद्र गुजराती पेन्शनर संघटना अध्यक्ष नाशिक यांनी सांगितले

Conclusion:भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी 2014च्या निवडणुकीत 95 पेन्शनराना भगतसिंग कोशाहरी अहवालानुसार दरमाह तीन हजार आणि अधिक महागाई भत्ता देण्याचे आश्वासन दिले होते तसेच सत्तेत येताच तीन महिन्यात पेन्शनमध्ये वाढ करण्याचेही आश्वासन दिले होते मात्र या दोन्ही आश्वासनांचा भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विसर पडलाय आणि जर ह्या सरकारने लक्षच दिले नाही तर येत्या लोकसभा निवडणुकीत नो कोशाहारी नो वोट असा नारा देत सत्ताधारी पक्षाला देशातील एकही पेन्शनधारक मतदान करणार नाही असा निर्णय सर्वच पेन्शन धारकांकडून घेण्यात आला
मात्र मोदींच्या सभेत हे आंदोलन पोलिस यंत्रणा कितपत यशस्वी होऊ देते की दडपशाहीने आंदोलन गुंडाळलं जातंय आणि जर पेन्शन धारकांनी नरेंद्र मोदींच्या सभेत आपलं आंदोलन गांधीगिरी मार्गाने केलाच तर त्याला पंतप्रधान कितपत प्रतिसाद देतात का फक्त आश्वासन देऊन वेळ मारून नेतात हे बघणं महत्त्वाचं आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.