ETV Bharat / briefs

यवतमाळमध्ये 9 नवे कोरोनाबाधित, एकाला डिस्चार्ज; जिल्ह्याचा आकडा १८१ वर - यवतमाळ कोरोना न्यूज अपडेट

रविवारी नव्याने आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नेर येथील पुरुष (57) आणि महिला (75) हे एकाच कुटुंबातील सदस्य आहे. तसेच नेर येथील 45 वर्षीय महिला आणि 21 वर्षीय युवक हे दोघे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. याशिवाय नेर येथील 52 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय दोन युवक आणि 32 वर्षीय एका युवकाचा समावेश आहे. तर उर्वरीत एक पॉझिटिव्ह रुग्ण (52) पुसद येथील आहे. सद्यस्थितीत अलगीकरण कक्षामध्ये 40 जण भरती असून यापैकी 34 जण कोरोना ॲक्टिव्ह आहेत.

yavatmal corona news
yavatmal corona news
author img

By

Published : Jun 14, 2020, 9:37 PM IST

Updated : Jun 14, 2020, 10:30 PM IST

यवतमाळ - गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे. रविवारी एकाच दिवशी तब्बल 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यामध्ये 7 पुरुष तर 2 महिलांचा समावेश आहे. यापैकी एक रुग्ण पुसद येथील आणि 8 रुग्ण हे नेर येथील आहे.

रविवारी नव्याने आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नेर येथील पुरुष (57) आणि महिला (75) हे एकाच कुटुंबातील सदस्य आहे. तसेच नेर येथील 45 वर्षीय महिला आणि 21 वर्षीय युवक हे दोघे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. याशिवाय नेर येथील 52 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय दोन युवक आणि 32 वर्षीय एका युवकाचा समावेश आहे. तर उर्वरीत एक पॉझिटिव्ह रुग्ण (52) पुसद येथील आहे. सद्यस्थितीत अलगीकरण कक्षामध्ये 40 जण भरती असून यापैकी 34 जण कोरोना ॲक्टिव्ह आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 181 झाली आहे. यापैकी 144 जण हे कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर कोरोनामुळे मृत्यु झालेल्या रूग्णांची संख्या 3 आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आतापर्यंत एकूण 2692 नमूने तपासणीसाठी पाठविले असून सर्व अहवाल प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2511 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

राज्यातील रेड झोनमधून आलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. ही चिंतेची बाब असून बाहेरून आलेल्या नागरिकांनी स्थानिकांच्या संपर्कात येऊ नये. तसेच स्थानिक नागरिकांनी सुध्दा आपल्या गावात आलेल्या लोकांबद्दल तात्काळ तालुका स्तरीय समितीला कळवावे. जेणेकरून त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्य होईल. नागरिकांनी अनावश्यकपणे बाहेर पडून गर्दी करू नये. या विषाणूच्या संसर्गाची मानवी साखळी तोडण्यासाठी घरातच सुरक्षित राहावे. अत्यावश्यक कारणासाठी बाहेर पडला तर मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतराच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

Last Updated : Jun 14, 2020, 10:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.